ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना ठोक ठोक ठोकला, पाकिस्तानचा शोएब मलिक म्हणतो, ‘डिप्रेशनमध्ये…’

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचा परफॉर्मन्स पाहून पाकिस्तानचा शोएब अख्तर आश्चर्यचकीत झाला आहे. शोएबने X वर व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने भारतीय संघाबद्दल मोठा दावा केला.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना ठोक ठोक ठोकला, पाकिस्तानचा शोएब मलिक म्हणतो, 'डिप्रेशनमध्ये...'
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 4:18 PM

भारतातील क्रिकेट प्रेमी सध्या टीम इंडियावर खूश आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा गेल्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच्या पराभवाचा वचपा काढला आहे. टीम इंडियाने काल टी-ट्वेन्टीच्या सुपर 8 सामन्यांमधील महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगलीच धूळ चारली. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याने तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलंच धुवून काढलं. भारताच्या या विजयानंतर भारतातील क्रिकेट चाहत्यांकडून प्रचंड आनंद व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावर भारतीय संघाच्या खेळाडूंचं चांगलंच कौतुक होत आहे. विशेष म्हणजे टीम इंडियावरील ही स्तुतीसुमनांची लाट पाकिस्तानातही पोहोचली आहे. कारण पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून शोएब अख्तरने एक व्हिडीओ ट्विट करत भारतीय फलंदाजाचं चांगलंच कौतुक केलं आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचा परफॉर्मन्स पाहून पाकिस्तानचा शोएब अख्तर आश्चर्यचकीत झाला आहे. शोएबने X वर व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शोएबने रोहित शर्माचं चांगलंच कौतु केलं आहे. रोहितने त्याच्या स्वत:च्या एकट्याच्या जीवावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला अक्षरश: पाणी पाजलं आहे, असं शोएब म्हणाला आहे. शोएब मलिक नेहमी त्याच्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत येत असतो. शोएबने यावेळी भारतीय संघाचं चांगलंच कौतुक केलं आहे. त्याने रोहित शर्माची इतकी स्तुती केली आहे की, जणू काही तो रोहित शर्माचा फॅनच झाला आहे. पण यावेळी त्याने भारतीय संघ हा डिप्रेशनमध्ये होता, असंदेखील म्हटलं आहे.

शोएक अख्तर नेमकं काय म्हणाला?

“भारतीय संघ जो डिप्रेशनमधून जात होता, त्या डिप्रेशनचं रुपांतर त्यांनी विजयात करुन दाखवलं आहे. वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला म्हणून भारतीय संघ डिप्रेशनमध्ये होता. तेच दु:ख घेऊन भारतीय संघ कालचा सामना खेळत होता. रोहितने काय कमाल केलीय. टीम इंडियाने जबरदस्त बदला घेतला आहे”, असं शोएब मलिक म्हणाला.

“भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला मारण्याच्या इराद्याने यावेळी मैदानात उतरलेली होती. रोहितने धमाका केला. रोहितने तेच केलं जे त्याला करायला हवं होतं. काय ताकदीने खेळला आहे. त्याने स्टार्कला काय मारलंय. माझं मन मला सांगत होतं की, रोहित एकटाच आज 150 धावा करेल”, असंदेखील शोएब मलिक म्हणाला.

टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक

भारतीय संघाने टी-ट्वेन्टीच्या वर्ल्ड कपमध्ये आता सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. आता येत्या 27 जूनला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान, नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरोधात पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारतीय संघाने 20 षटकांत 205 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 181 धावांपर्यंत पोहोचू शकला. त्यामुळे भारतीय संघाचा 24 धावांनी विजय झाला.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.