IPL 2023 : CSK मध्ये MS Dhoni चा उत्तराधिकारी कोण? Wasim Akram ने सुचवलं मराठी मुलाचं नाव

IPL 2023 : चालू IPL 2023 चा सीजन कदाचित धोनीचा शेवटचा सीजन ठरु शकतो. अशावेळी धोनीचा उत्तराधिकारी कोण असेल? याची चर्चा आहे. वेगवेगळी नाव चर्चेत आहेत. अक्रमने एक नाव सुचवलय.

IPL 2023 : CSK मध्ये MS Dhoni चा उत्तराधिकारी कोण? Wasim Akram ने सुचवलं मराठी मुलाचं नाव
IPL 2023 MS dhoni Wasim AkramImage Credit source: Getty Images/ANI
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 3:12 PM

लाहोर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये क्रिकेटच्या बरोबरीने एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. आयपीएलचा चालू 16 वा सीजन धोनीचा शेवटचा सीजन ठरु शकतो, असं काही जणांच मत आहे. एमएस धोनी आता 41 वर्षांचा आहे. खरंतर मागच्या दोन वर्षांपासून एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. एमएस धोनी अजूनही फिटनेस टिकवून आहे. आयपीएलमध्ये त्याच्यातील चपळता अजूनही कमी झालेली नाही. फक्त वयामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा आहे.

एमएस धोनीचा या वयातील फिटनेस अनेकांना लाजवणारा आहे. तुम्ही कितीही फिट असलात, तरी क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी ना कधी थांबावच लागतं. एमएस धोनी क्रिकेट विश्वातील उत्तम लीडर आहे. कदाचित हा त्याचा शेवटचा सीजन ठरु शकतो. आज धोनीच्या बरोबरीने क्रिकेट खेळलेला अपवादानेच एखाद-दुसरा आयपीएलमध्ये खेळत असावा.

अक्रमने निवडला धोनीचा उत्तराधिकारी

मागच्या 2022 च्या सीजनमध्ये एमएस धोनीने टीमच नेतृत्व सोडलं होतं. त्याने रवींद्र जाडेजाच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवली होती. पण जाडेजाला जमलं नाही. त्यामुळे सीजनच्या मध्यावर त्याला नेतृत्व हाती घ्याव लागलं. एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन कोण असेल? याची चाहत्यांना उत्सुक्ता आहे. पाकिस्तानचा महान क्रिकेटपटू वसिम अक्रमने त्याच्याबाजूने सीएसके टीममधील धोनीचा उत्तराधिकारी निवडला आहे.

वसिम अक्रमने सांगितलं, त्याचं नाव

धोनी चालू सीजननंतर निवृत्त होणार असेल, तर वसिम अक्रमच्या मते सीएसकेकडे आधीपासूनच त्याची रिप्लेसमेंट तयार आहे. धोनी रिटायर झाला, तर त्याचीजागा घेण्यासाठी अजिंक्य रहाणे योग्य पर्याय आहे, असं वसिम अक्रमच मत आहे. फ्रेंचाजयी क्रिकेटमध्ये यशस्वी कोण?

“सीएसकेने मागच्या सीजनमध्ये रवींद्र जाडेजाला कॅप्टन बनवून पाहिलं. त्याच्या स्वत:च्या परफॉर्मन्सवर परिणाम झाला. त्यांना कॅप्टन बदलावा लागला. अजिंक्य रहाणेपेक्षा चांगला पर्याय मिळेल, असं वाटत नाही. त्याच्या कामगिरीत सातत्य आहे. फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये स्थानिक क्रिकेटपटू यशस्वी ठरले आहेत” असं वसिम अक्रम स्पोर्ट्सकीडावर म्हणाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.