Pakistan ICC World Cup 2023 Full Schedule : फुकटचा आरडाओरडा करणाऱ्याा पाकिस्तानला आयसीसीने दाखवून दिली जागा
Pakistan ICC World Cup 2023 Cricket Full Schedule in Marathi | ड्राफ्ट शेड्युल आल्यानंतर पाकिस्तानने बराच आरडाओरडा केला होता. अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होते.
मुंबई : BCCI ने आयसीसी वर्ल्ड कप 2023 च ड्राफ्ट शेड्यूल पाठवल्यापासून पाकिस्तानचा फुकटचा आरडा-ओरडा सुरु होता. पाकिस्तानने वर्ल्ड कपच्या शेड्युलवर काही आक्षेप नोंदवले होते. काही मागण्या केल्या होत्या. पाकिस्तानला त्यांच्या काही सामन्यांच्या ठिकाणाबद्दल आक्षेप होता. पाकिस्तानने काही बदल सुचवले होते. त्यांनी आयसीसीकडे तशी मागणी केली होती. आज वर्ल्ड कप 2023 च शेड्युल जाहीर झालय.
ओरिजनल शेड्युल कसं असणार? ड्राफ्ट शेड्युलमध्ये काय बदल होणार? भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख काय? पाकिस्तानच्या मागण्यांची दखल घेतली जाईल का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होते. आज त्या सगळ्यांची उत्तर मिळाली आहेत.
पाकिस्तानची काय मागणी होती?
ड्राफ्ट शेड्युलमध्ये बीसीसीआयने पाकिस्तानचा अफगाणिस्तान विरुद्धचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ठेवला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानचा सामना बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. पाकिस्तानला अफगाणिस्तान विरुद्धचा सामना बंगळुरु आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना चेन्नईत खेळायचा होता. तशी मागणी त्यांनी आयसीसीकडे केली होती.
GET YOUR CALENDARS READY! ?️?
The ICC Men’s @cricketworldcup 2023 schedule is out now ⬇️#CWC23https://t.co/j62Erj3d2c
— ICC (@ICC) June 27, 2023
ICC ने काय केलं?
पण आयसीसीने पाकिस्तानची मागणी धुडकावून लावली आहे. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना 20 ऑक्टोबरला बंगळुरुत आणि अफगाणिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला चेन्नईत खेळायच आहे. त्याशिवाय टीम इंडिया विरुद्ध चेन्नई, कोलकाता किंवा बंगळुरुमध्ये खेळण्याची इच्छा होती. पण पाकिस्तानला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच मॅच खेळावी लागेल.
पाकिस्तानच वर्ल्ड कप 2023 शेड्युल
6 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, हैदराबाद
12 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, हैदराबाद
15 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध भारत, अहमदाबाद
20 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरु
23 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान, चेन्नई
27 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध साऊथ अफ्रीका, चेन्नई
31 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश, कोलकाता
5 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध न्यूजीलंड, बंगळुरु
12 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, कोलकाता