PAK vs ENG T20 WC Final: पाकिस्तानच्या पाच मोठ्या चूका, ज्यामुळे त्यांनी गमावला वर्ल्ड कप
PAK vs ENG T20 WC Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानने डॉट बॉलमध्ये हद्दच केली.....
मेलबर्न: पाकिस्तानच्या क्रिकेट टीमने T20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली. फायनलमध्ये पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 138 धावा केल्या. इंग्लंडने 19 व्या ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. फायनलमध्ये पाकिस्तानने जबरदस्त गोलंदाजी केली. पण छोटं लक्ष्य असल्यामुळे ते इंग्लंडला रोखू शकले नाहीत. इंग्लंडच्या टीमने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकलाय. पाकिस्तानच्या पराभवाची कारण काय ते जाणून घेऊया.
खराब ओपनिंग पाकिस्तानच्या पराभवाच सर्वात मोठं आणि पहिलं कारण आहे. सेमीफायनल मॅच सोडली, तर 6 सामन्यात पाकिस्तानी सलामीवीरांची जोडी अपयशी ठरली. फायनलमध्येही हेच पहायला मिळालं. मोहम्मद रिजवान आणि बाबर आजमने 26 चेंडूत 29 धावा केल्या. रिजवान फक्त 15 रन्स करुन आऊट झाला.
पाकिस्तानने फायनलमध्ये थोडे थोडके नाही, तर तब्बल 48 चेंडू डॉट घालवले. म्हणजे त्यावर एकही धाव काढली नाही. बाबर आजम, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद हॅरिस यांनी सर्वाधिक डॉट बॉल खेळले. म्हणजे 8 ओव्हरमध्ये एकही धाव नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पाकिस्तानची एकूण धावसंख्या 137 पर्यंतच पोहोचली.
शाहीन आफ्रिदीची दुखापत पाकिस्तानच्या पराभवाच तिसर कारण आहे. हॅरी ब्रूकची कॅच घेताना शाहीन शाह आफ्रिदीला दुखापत झाली. त्याचा गुडघा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो 2.1 ओव्हरच गोलंदाजी करु शकला. याचा फायदा इंग्लंडला मिळाला. इफ्तिखारच्या पाच बॉलमध्ये इंग्लंडने 13 धावा फटकावल्या.
View this post on Instagram
पाकिस्तानला शाहीनच्या दुखापतीमुळे नुकसान झालं. त्याशिवाय मोहम्मद वसीमच्या गोलंदाजीत ती धार दिसली नाही. त्याचा फायदा इंग्लंडने उचलला.
पाकिस्तानच्या टीमचं इंग्लंडच्या गोलंदाजांनी बरच नुकसान केलं. सॅम करनने 4 ओव्हरमध्ये 12 धावा देऊन 3 विकेट काढल्या. आदिल रशीदने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 2 विकेट काढल्या.