IND vs PAK: भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू थेट लंडनला रवाना, जाणून घ्या कारण…

IND vs PAK: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारताकडून 5 विकेटने (IND vs PAK) पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू थेट लंडनला रवाना झाला.

IND vs PAK: भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू थेट लंडनला रवाना, जाणून घ्या कारण...
pakistan teamImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 6:37 AM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारताकडून 5 विकेटने (IND vs PAK) पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू थेट लंडनला रवाना झाला. पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हन मधला हा खेळाडू आहे, असं तुम्हाला वाटेल. पण असं नाहीय. दुबई मध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) लंडनला रवाना झाला. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे शाहीन शाह आफ्रिदीचा पाकिस्तानी संघात समावेश केलेला नाही. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो पाकिस्तानी संघासोबत दुबईला आला होता. पण रिहॅबसाठी तो लंडनला निघून गेला आहे. शाहीन शाह आफ्रिदी लंडनला गेल्याची माहिती पीसीबीकडून देण्यात आली. शाहीन शाह आफ्रिदी भले पाकिस्तानी संघात नसेल, पण दुबई मध्ये त्याने भारत-पाकिस्तान सामन्याचा रोमांच अनुभवला. शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने षटकार ठोकून या सामन्याचा निकाल लावला. भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीची उणीव प्रकर्षाने जाणवली.

शाहीन शाह आफ्रिदी लंडनला रवाना

“शाहीनच्या गुडघ्यांची यावेळी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लंडन मध्ये त्या सगळ्या सुविधा आहेत. शाहीन आमचा महत्त्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेऊन आम्ही त्याला लंडनला पाठवलं” असं PCB चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नजीबुल्लाह सोमरो म्हणाले. “आमचा मेडिकल विभाग लंडनच्या संपर्कात असेल. शाहीनची रिकव्हरीवर सातत्याने फिडबॅक घेतला जाईल. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप पर्यंत शाहीन शाह आफ्रिदी पूर्णपणे फिट होईल, हा आम्हाला विश्वास आहे” असं नजीबुल्लाह सोमरो यांनी सांगितलं.

श्रीलंकेविरुद्ध कसोटीत झाली होती दुखापत

शाहीन शाह आफ्रिदीला जुलै मध्ये गुडघे दुखापतीचा त्रास सुरु झाला होता. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. वर्ल्ड कप 2022 पर्यंत तो पाकिस्तानच्या टी 20 संघात दिसेल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल सल्लागार पॅनलला यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे. भारताने आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. 2 चेंडू राखून भारताने विजय मिळवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.