IND vs ENG: पाकिस्तानी पंतप्रधानांकडे खरच काम नाही का? पराभवानंतर टीम इंडियाला डिवचणारं टि्वट

IND vs ENG: पाकिस्तानी पंतप्रधानांवर टि्वट चोरल्याचा आरोप

IND vs ENG: पाकिस्तानी पंतप्रधानांकडे खरच काम नाही का? पराभवानंतर टीम इंडियाला डिवचणारं टि्वट
Shehbaz SharifImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 7:59 PM

लाहोर: टीम इंडियाचा आज टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये दारुण पराभव झाला. इंग्लंडने टीम इंडियावर 10 विकेटने विजय मिळवला. विजसाठी दिलेलं 169 धावांच टार्गेट 16 व्या ओव्हरमध्येच पार केलं. जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी 170 धावांची रेकॉर्ड भागीदारी केली. या पराभवामुळे अनेक क्रिकेटप्रेमींच भारत-पाकिस्तान फायनल सामना पाहण्याच स्वप्न भंगलं.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र खूप आनंद

या पराभवामुळे टीम इंडियाचे जगभरातील चाहते निराश झालेत. पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र खूप आनंद झाल्याच दिसतय. त्यांनी केलेल्या टि्वटवरुन हे दिसून आलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर त्यांनी एक डिवचणार टि्वट केलं. त्यामुळे भारतीय चाहते मात्र चांगलेच खवळलेत.

त्या पार्टनरशिपची आठवण करुन दिली

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाचा 10 विकेटने इतका मोठा पराभव झालाय. मागच्यावर्षी दुबईत टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला होता. त्यावेळी बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांनी नाबाद 152 धावांची भागीदारी केली होती. आज अशीच कामगिरी जोस बटलर आणि एलेक्स हेल्सने केली. त्यांनी नाबाद 170 धावांची भागीदारी केली. टि्वट चोरल्याचा आरोप

पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी त्याच पाकिस्तानच्या विजयाची आठवण करुन दिली. त्यांच्या या टि्वटवर लोक भडकले. त्यांना चांगलच सुनावलं. एका फॅनने त्यांच्यावर आपलं टि्वट चोरल्याचा आरोप केला. कमीत कमी आपल्या पदाची प्रतिष्ठा लक्षात घ्यावी, असं एका युजरने म्हटलं आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.