IPL 2023 नंतर KL Rahul चा सहकारी पाकिस्तानी टीमशी जोडला जाणार, मिळाली मोठी जबाबदारी

IPL 2023 LSG News : मागच्या सीजनमध्ये केएल राहुलची टीम टॉप 4 मध्ये पोहोचली होती. यावेळी जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने लखनौ सुपर जायंट्सची टीम मैदानात उतरेल.

IPL 2023 नंतर KL Rahul चा सहकारी पाकिस्तानी टीमशी जोडला जाणार, मिळाली मोठी जबाबदारी
lsg Image Credit source: lsg
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 9:47 AM

IPL 2023 LSG News : केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सच्या टीमने मागच्या सीजनमध्ये आयपीएल डेब्यु केला होता. टीमने पहिल्या सीजनमध्ये चांगला खेळ दाखवला. पण ते फायनलमध्ये प्रवेश करु शकले नाहीत. यावेळी फायनलमध्ये पोहोचण्याच्या इराद्याने लखनौची टीम मैदानात उतरेल. बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांच्यावर लखनौ टीमला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी आहे. लखनौ टीमला बॉलिंगचे धडे दिल्यानंतर ते थेट पाकिस्तानला रवाना होतील.

पाकिस्तान क्रिकेट टीम बऱ्याच महिन्यांपासून कोचिंग स्टाफ नियुक्तीच्या प्रोसेसमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी माजी कोच मिकी आर्थर यांना ऑनलाइन कोच बनवलं होतं. पण आता वर्ल्ड कप डोळ्यासमोर असल्याने पाकिस्तानला कायमस्वरुपी कोचिंग स्टाफ हवा आहे. यासाठी त्यांनी ज्या लोकांना निवडलय, त्यात लखनौ सुपर जायंट्सचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल सुद्धा आहेत. अँड्रयू पट्टिक यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे.

महिला टी 20 टीमचे कोच

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज आणि लखनौ टीमचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांना बॉलिंग कोच बनवण्याचा निर्णय घेतलाय. मॉर्केल न्यूझीलंडच्या महिला टी 20 टीमचे सुद्धा कोच होते. मार्केल याआधी मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्ड कप दरम्यान नामीबियाच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. S 20 लीगमध्ये ते डरबन टीमचे बॉलिंग कोच आहेत.

पाकिस्तानची बॅटिंग सुधारण्यासाठी काम करणार

मार्केल यांच्याशिवाय पट्टिक यांची निवड करण्यात आली आहे. ते पाकिस्तानी टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून काम करतील. पट्टिक दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीमचे कोच होते. आपल्या देशाच्या ए टीमचे ते सहाय्यक कोच सुद्धा होते. आता ते बाबर आजम आणि कंपनीची बॅटिंग सुधारण्यासाठी काम करतील. पाकिस्तानचे मुख्य कोच कोण?

या दोघांशिवाय पीसीबीने न्यूझीलंडचे माजी ऑलराऊंडर ग्रांट ब्रॅडबर्न यांना मुख्य कोच बनवण्याचा निर्णय घेतलाय. ते आधी फिल्डिंग कोच होते. त्यांच्यावर युवा पाकिस्तानी क्रिकेटर्सना ट्रेन करण्याची जबाबदारी होती. त्यांनी पाकिस्तानच्या नॅशनल अकादमीत काम केलय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.