सेहवागने 2004 साली पाकला धू-धू धूतलं तेव्हा ढसाढसा रडला होता, आता पाकिस्तान संघात केलं डेब्यू
पाकिस्तानच्या संघात एका युवा खेळाडूने डेब्यू केलंय. त्याने पहिल्याच सामन्यात ७ विकेट घेत मोठा कारनामा केलाय.
Pakistan vs England : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीज खेळत आहे. पहिला सामना इंग्लंडने जिंकत सीरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता मुल्तानमध्ये दुसरा टेस्ट सामना सुरु आहे. पण पाकिस्तान संघात डेब्यु करणाऱ्या एका खेळाडूची सध्या चर्चा आहे. लेग स्पिनर अबरार अहमदने ( Abrar Ahmed ) पाकिस्तान संघात शानदार पद्धतीने डेब्यू केलंय.
अबरारने त्याच्या पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या ७ खेळाडूंना माघारी पाठवलंय. अबरार डेब्यू टेस्ट इनिंगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आला आहे. त्याच्या आधी मोहम्मद जाहिद आणि मोहम्मद नाजिर याने हा कारनामा केला होता.
मुल्तानचं हे मैदान अबरारसाठी खास आहे.त्याच्या भावाने याबाबत एक खुलासा केलाय. त्याने म्हटलं की, ‘2004 साली भारतीय संघ जेव्हा पाकिस्तान दौऱ्यावर होता. तेव्हा भारताचा ओपनर विरेंद्र सेहवाग याने या मैदानावर तिहेरी शतक ठोकलं होतं. त्यावेळी अबरार ६ वर्षांचा होता. सेहवागने समलैन मुश्ताक याच्या बॉलिंगवर शानदार शॉट्स खेळत त्याची चांगलीच धुलाई केली होती. तेव्हा अबरार खूपच भावूक झाला होता.’
अबरारला 5 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. तो सर्वात लहान आहे. अबरार याला लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा होती.