पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूची खुलेआम इज्जत काढली, व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं असं काही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी पाहून क्रीडाप्रेमी संतापले आहेत. त्यात टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरल्याने तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्यामुळे खेळाडूंना जिथे संधी मिळेल तिथे डिवचण्याचा प्रयत्न होत आहे. आता स्टार खेळाडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूची खुलेआम इज्जत काढली, व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं असं काही
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 8:24 PM

पाकिस्तान संघाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नाचक्की झाली आहे. पाकिस्तान संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळण्याची वेळ आली. त्यामुळे जेतेपदाची भाबडी आशा बाळगून असलेल्या चाहत्यांना राग अनावर झाला आहे. पाकिस्तान संघात असलेले खेळाडूंना जिथे असतील तिथे ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर तर हास्यकल्लोळ माजला आहे. अशात सोशल मीडियावर पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी चाहते हा व्हिडीओ शेअर करत सासऱ्याचा गुलाम अशी टीका करत आहेत. हा व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या खेळाडूचा नसून वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. यात शाहीन आफ्रिदी सासरा शाहिद आफ्रिदीसोबत आहे. यात व्हिडीओत शाहीन हा शाहिद आफ्रिदीच्या मागे मागे फिरताना दिसत आहे. त्यामुळे त्याला ट्रोल करण्याची आयती संधी चाहत्यांना मिळाली. शाहिद आफ्रिदीने वशिला लावून शाहीनला पाकिस्तानचा कर्णधार केल्याची टीकाही होत आहे. इतकंच काय तर कर्णधारपदावरून दूर गेल्यानंतर बाबर आझमसोबत दूरावाही निर्माण झाला आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाजी वसीम अक्रमने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेदरम्यान बाबर आणि शाहीनबाबत एक धक्कादायक खुलासा केला होता. या दोघांमध्ये बिनसल्याचं त्याने स्पर्धेदरम्यानच सांगितलं होतं. इतकंच काय तर एकमेकांशी बोलत नसल्याचंही जाहीर केलं होतं. वसीम अक्रमच्या मते, बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी कर्णधारपद बदलल्यापासून एकमेकांशी बोलत नाहीत. या बातमीनंतर, चाहत्यांनी यासाठी शाहिद आफ्रिदीला दोषी धरलं आहे. या दोघांमध्ये वाद होण्यास शाहिद आफ्रिदी जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शाहीन शाह आफ्रिदीने शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत 3 फेब्रुवारी 2023 रोजी निकाह केला होता.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं होतं. पाकिस्तानने 159 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान अमेरिकेने गाठत बरोबरी साधली होती. त्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 18 धावा केल्या. पाकिस्तानला मात्र फक्त 13 धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. भारताने दिलेले 119 धावांचं आव्हान गाठता आलं नाही.

Non Stop LIVE Update
राज्यात रिमझिम, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस? हवामानखात्याकडून मोठ अपडेट
राज्यात रिमझिम, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस? हवामानखात्याकडून मोठ अपडेट.
मनसे, वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे ठाकरेंचा हात धरणार,या दिवशी प्रवेश
मनसे, वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे ठाकरेंचा हात धरणार,या दिवशी प्रवेश.
टीम इंडियानं घेतली मोदींची भेट, दीड तास संवाद, काय झाली चर्चा?
टीम इंडियानं घेतली मोदींची भेट, दीड तास संवाद, काय झाली चर्चा?.
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार?
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार?.
टीम इंडिया मायदेशी दाखल, बघा भारतीयांकडून कसं झालं दणक्यात स्वागत?
टीम इंडिया मायदेशी दाखल, बघा भारतीयांकडून कसं झालं दणक्यात स्वागत?.
'लाडक्या बहिणी'त 'मनसे'चा मुस्लिम अँगल, नेमका कुणाला अन का केला विरोध?
'लाडक्या बहिणी'त 'मनसे'चा मुस्लिम अँगल, नेमका कुणाला अन का केला विरोध?.
मंडपात चप्पलांचा खच, शंभरहून अधिक भक्त चिरडून ठार अन् बाबा झाला फरार
मंडपात चप्पलांचा खच, शंभरहून अधिक भक्त चिरडून ठार अन् बाबा झाला फरार.
महिलांनो...आता फक्त 'हीच' कागदपत्रं आवश्यक; 'या' तारखेच्या आत करा अर्ज
महिलांनो...आता फक्त 'हीच' कागदपत्रं आवश्यक; 'या' तारखेच्या आत करा अर्ज.
विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत कोण? कोणाचा खेळ होणार?
विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत कोण? कोणाचा खेळ होणार?.
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....