Babar Azam ने आपल्याच टीमला असं हरवलं, शाहीन आफ्रिदीने हिसकावला विजय VIDEO
PSL 2023 : बाबर आजममुळेच त्याची टीम हरली. लीगमधून बाहेर झाल्यानंतर बाबर आजमने पराभवाच कारण सांगितलं. पेशावर जाल्मीच्या पराभवाला बाबर आजम स्वत: कारणीभूत आहे.
PSL 2023 : शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्सने बाबर आजमच्या पेशावर जाल्मीला पाकिस्तान सुपर लीगमधून बाहेर केलय. एलिमिनेटर 2 मध्ये लाहोरने पेशावरला 4 विकेट्सने हरवलं. पहिली बॅटिंग करताना बाबरच्या टीमने 172 धावांच लक्ष्य दिलं होतं. लाहोरच्या टीमने 7 चेंडूंआधी 6 विकेट राखून विजय मिळवला. 42 चेंडूत 54 धावा फटकावणारा मिर्जा बेग प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.
लीगमधून बाहेर झाल्यानंतर बाबर आजमने पराभवाच कारण सांगितलं. पेशावर जाल्मीच्या पराभवाला बाबर आजम स्वत: कारणीभूत आहे.
बाबरने स्वत: किती रन्स केल्या?
स्कोर कमी होता. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, टीमच्या 11 ओव्हरमध्ये 100 धावा होत्या. त्यानंतर कमी धावा झाल्या. लाहोरच्या टीमने चांगली गोलंदाजी केली. बाबरच्या मते, पराभवाला धीम्या गतीने केलेली फलंदाजी कारणीभूत ठरली. बाबर स्वत: 12 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर राशिद खानच्या चेंडूवर LBW बाद झाला. त्याने 42 धावा केल्या. पण त्यासाठी त्याने 36 चेंडू घेतले. टी 20 क्रिकेटचा विचार केल्यास, धावा आणि चेंडूंचा विचार केल्यास हा आकडा समाधानकारक नाही.
बाबरची धीमी बॅटिंग
बाबरने 36 चेंडूत 42 धावा करताना 7 चौकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 116.66 चा होता. आमेर जमालनंतर हा कमी स्ट्राइक रेट आहे. बाबर आजम ज्या ओव्हर्समध्ये कमी धावा झाल्या म्हणतोय, तेव्हा तो स्वत: क्रीजवर होता. फायदा नाही उचलता आला
बाबरच्या धीम्या गतीने केलेल्या फलंदाजीवर बरीच टीका होतेय. बाबर बॅटिंग करताना समोरच्या बाजूला मोहम्मह हॅरिस उभा होता. बाबरला त्यावेळी वेगाने फलंदाजी करुन धावगती वाढवायला पाहिजे होती. पण तो असं करु शकला नाही. ज्यामुळे त्यांच्या टीमच नुकसान झालं. पेशावर जाल्मीने 5 विकेट गमावून 171 धावा केल्या. हे लक्ष्य लाहोरच्या टीमने आरामात पार केलं.