Australia vs Pakistan T20 World Cup: मॅथ्यू वेड चमकला, लागोपाठ 3 षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाचा विजय, 5 गड्यांसह एक ओव्हर राखून विजय

| Updated on: Nov 11, 2021 | 11:19 PM

Pakistan vs Australia T20 world cup: पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. आता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत फायनलमध्ये जागा मिळवली आहे.

Australia vs Pakistan T20 World Cup: मॅथ्यू वेड चमकला, लागोपाठ 3 षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाचा विजय, 5 गड्यांसह एक ओव्हर राखून विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

यंदाचा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. दोन्ही फायनलिस्ट समोर आले असून पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला मात देत न्यूझीलंडने अंतिम सामन्यात जागा मिळवली होती. ज्यानंतर आता चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात देत फायनल गाठली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 176 धावांपर्यंत मजल मारली होती. जे टार्गेट ऑस्ट्रेलियाने 5 गडी आणि एक ओव्हर राखून पूर्ण केलं आहे. यावेळी मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड हे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Nov 2021 11:15 PM (IST)

    AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय

    19 व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने पाकिस्तानच्या शाहीनला लागोपाठ 3 षटकार ठोकत एक ओव्हर शिल्लक ठेवून विजय मिळवून दिला आहे.

  • 11 Nov 2021 11:09 PM (IST)

    AUS vs PAK: मोक्याच्या क्षणी मॅथ्यूचे सिक्सेस

    धावांची गरज असतानाच मॅथ्यू वेडने दोन दमदार षटकार ठोकले आहेत. आता ऑस्ट्रेलियाला 7 चेंडूत 6 धावांची गरज आहे.

  • 11 Nov 2021 11:03 PM (IST)

    AUS vs PAK: स्टॉयनिस क्रिजवर टिकून, अखेरच्या 2 ओव्हर शिल्लक

    सामन्यात अखेरच्या दोन ओव्हर शिल्लक असून 12 चेंडूत ऑस्ट्रेलियाला 22धावांची गरज आहे. सध्या स्टॉयनिस आणि  मॅथ्यू चौकार, षटकार ठोकत आहेत.

  • 11 Nov 2021 10:59 PM (IST)

    AUS vs PAK: अखेरच्या 3 ओव्हरमध्ये 37 धावांची गरज

    ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अखेरच्या 3 ओव्हरमध्ये 37 धावांची गरज आहे. त्यांचे 5 गडी बाद झाले असून सध्या स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड क्रिजवर आहेत.

  • 11 Nov 2021 10:48 PM (IST)

    AUS vs PAK: शादाब खानची अप्रतिम गोलंदाजी

    सामन्यात पाकिस्तानच्या शादाबने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या आहेत.

  • 11 Nov 2021 10:39 PM (IST)

    AUS vs PAK: ग्लेन मॅक्सवेल आऊट

    शादाब खानच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या नाकात दम केला आहे. त्याने 7 धावांवर खेळणाऱ्या मॅक्सवेलला बाद केलं आहे.

  • 11 Nov 2021 10:26 PM (IST)

    AUS vs PAK: वॉर्नरंच अर्धशतक हुकलं

    ऑस्ट्रेलियाचा डाव एकहाती सांभाळणारा डेव्हिड वॉर्नरही बाद झाला आहे. तो 49 धाव करुन बाद झाला आहे. शादाबनेच त्याची विकेट घेतली आहे.

  • 11 Nov 2021 10:18 PM (IST)

    AUS vs PAK: स्मिथही बाद

    ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा महत्त्वाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ बाद झाला आहे. 5 धावा करुन शादाबने त्याची विकेट घेतली आहे.

  • 11 Nov 2021 10:03 PM (IST)

    AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका

    कर्णधार बाद झाल्यानंतर डेव्हिड आणि मिचेल हे संघाचा डाव सावरत असताना मिचेल मार्श 28 धावा करुन बाद झाला आहे. शादाबने त्याला बाद केलं आहे.

  • 11 Nov 2021 09:38 PM (IST)

    AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार शून्यावर बाद

    ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच शून्यावर बाद झाला आहे. शाहीन आफ्रीदीने त्याला पायचीत केलं आहे.

  • 11 Nov 2021 09:17 PM (IST)

    AUS vs PAK: ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे आव्हान

    अखेरच्या काही षटकात फखर जमान नावाचं वादळ मैदानात आवतरल्याने पाकने 176 धावांपर्यंत मजल मारली आहे. फखरने 32 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आता 177 धावांचे आव्हान आहे.

  • 11 Nov 2021 09:07 PM (IST)

    AUS vs PAK: असीफ अलीही बाद

    पाकच्या संघाचा असीफ अली शून्य धावा करुन बाद झाला आहे. कमिन्सच्या चेंडूवर स्मिथनेच त्याचा झेल पकडला आहे.

  • 11 Nov 2021 09:00 PM (IST)

    AUS vs PAK: मोहम्मद रिजवान आऊट

    52 चेंडूत 67 धावांची खेळी केल्यानंतर मोहम्मद रिजवान बाद झाला आहे. स्टार्चच्या चेंडूवर स्मिथने त्याचा झेल पकडला आहे.

  • 11 Nov 2021 08:47 PM (IST)

    AUS vs PAK: मोहम्मद रिजवानचं दमदार अर्धशतक

    पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवाननं दमदार अर्धशतक ठोकत संघाचा डाव सावरला आहे. 120 धावानंतर पाकिस्तानचा केवळ एक गडीच बाद झालेला आहे.

  • 11 Nov 2021 08:16 PM (IST)

    AUS vs PAK: बाबर आजम बाद

    पाकिस्तान संघाने उत्तम सुरुवात केली असताना अखेर त्यांचा पहिला गडी बाद झाला आहे. कर्णधार बाबर आजम 39 धावा करुन बाद झाला आहे. अॅडम झाम्पाच्या चेंडूवर फिंचने त्याचा झेल पकडला आहे.

  • 11 Nov 2021 08:15 PM (IST)

    पुणे

    जरीफ खान याच्या घरावरील ईडीची कारवाई पूर्ण

    कागदपत्र घेऊन ईडीचे अधिकारी निघाले

  • 11 Nov 2021 08:02 PM (IST)

    AUS vs PAK: बाबर-रिजवान जोडीचा कहर

    पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिजवान दोघेही दमदार फलंदाजी करत आहेत. 50 धावांचा टप्पा पार करत 7 षटकानंतर पाकचा स्कोर 51 धावा आहे.

  • 11 Nov 2021 07:46 PM (IST)

    मुंबई 

    आजही परिवहन विभागाची मोठी कारवाई,

    दिवसभरात 1135 कर्मचारी केले निलंबित,

    पुण्यात 138 कर्मचारी केले निलंबित

    आतापर्यंत 2053 कर्मचाऱ्यांवर कारवाई

  • 11 Nov 2021 07:45 PM (IST)

    पुणे 

    ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना घेतलं ताब्यात

    भगवान कांबळे, सतीश निवृत्ती राजगुरू उर्फ महेश पाटील अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नाव

  • 11 Nov 2021 07:44 PM (IST)

    AUS vs PAK: बाबर आजमचा उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह

    पाकिस्तानच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट फलंदाजीचं दर्शन घडवण्यास सुरुवात केली आहेत. 3 ओव्हरनंतर स्कोर 21 झाला आहे.

  • 11 Nov 2021 07:32 PM (IST)

    AUS vs PAK: पाकिस्तानचे सलामीवीर मैदानात

    ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी निवडल्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज मैदानात आले आहेत. कर्णधार बाबर आजमसह मोहम्मद रिजवान मैदानात उतरला आहे.

  • 11 Nov 2021 07:23 PM (IST)

    AUS vs PAK: मोठी फटकेबाजी होण्याची दाट शक्यता

    पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाची स्पर्धेतील कामगिरी पाहता आज दमदार फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळणार हे नक्की.

  • 11 Nov 2021 07:10 PM (IST)

    AUS vs PAK: दोन्ही संघाचे अंतिम 11

    पाकिस्तान संघ: मोहम्मद रिजवान, बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, असीफ अली, शाहीन आफ्रीदी

    ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, आरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्च, अॅडम झाम्पा, जोश हॅजलवुड.

  • 11 Nov 2021 07:09 PM (IST)

    Australia vs Pakistan Toss Update: ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय

    महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेकीत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. त्यांनी नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Published On - Nov 11,2021 7:07 PM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.