PAK vs ENG: इंग्रजांनी पाकिस्तानच्या घरात जाऊन त्यांचं नाक कापलं, टेस्ट सीरीजचा निकाल
PAK vs ENG: 17 वर्षानंतर इंग्लंडच्या टीमने पाकिस्तानात करुन दाखवलं
लाहोर: इंग्लंडचा संघ 17 वर्षानंतर पाकिस्तानात टेस्ट सीरीज खेळण्यासाठी गेला होता. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानला धुळ चारली. मुल्तानमध्ये दुसरा कसोटी सामना झाला. इंग्लंडच्या टीमने पाकिस्तानवर 26 धावांनी विजय मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडच्या टीमने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने रावळपिंडीमध्ये खेळला गेलेला पहिला कसोटी सामना जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटीतही त्यांनी विजय मिळवलाय. इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 355 धावांच लक्ष्य दिलं होतं. पाकिस्तानची टीम 328 धावात ऑलआऊट झाली.
पहिल्या-दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा सरस खेळ
इंग्लंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 281 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानची टीम 202 रन्समध्ये ऑलआऊट झाली. दुसऱ्या डावात इंग्लंडकडे 79 धावांची आघाडी होती. त्यांनी 275 धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी 355 धावांच लक्ष्य दिलं. पण पाकिस्तानी टीम या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाही. पाकिस्तानला आपल्याच घरात मालिका गमवावी लागली.
पाकिस्तानचा डाव असा गडगडला
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली, त्यावेळी पाकिस्तानच्या 4 बाद 198 धावा झाल्या होत्या. आज दिवसाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या खात्यात 11 धावा जमा झाल्या होत्या. त्याचवेळी फहीम अशरफ आऊट झाला. त्याने 10 रन्स केल्या. ज्यो रुटने त्याचा विकेट घेतला. त्यानंतर मोहम्मद नवाजने सौद शकीलसोबत चांगली भागीदारी केली. त्याने पाकिस्तानच्या टीमला मॅच जिंकण्याच्या स्थितीमध्ये ठेवलं. दोघांनी 80 धावांची भागीदारी केली. 290 धावा असताना, मोहम्मद नवाज त्यानंतर शकील आऊट झाला. शकीलच शतक हुकलं. त्याने 213 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 94 धावा केल्या. नवाज 45 रन्सवर आऊट झाला. अशरफला सुद्धा रुटने बाद केलं. शकीलचा विकेट मार्क वुडने घेतला.
बेन स्टोक्सकडून गोलंदाजीत बदल
319 धावांवर पाकिस्तानचा नववा विकेट पडला. त्यानंतर सलमानने थोडा प्रतिकार केला. तो काही चांगले फटके खेळला. संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी स्टोक्सने गोलंदाजीत बदल केला. ऑली रॉबिनसनला गोलंदाजीसाठी आणलं. त्याने महमूदला आऊट करुन पाकिस्तानचा डाव संपवला. e