PAK vs ENG: रावळपिंडी टेस्टआधीच पाकिस्तानची मोठी फजिती होण्याची शक्यता, कारण…
PAK vs ENG: असं झाल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रतिष्ठेच काय?
मुंबई: इंग्लंडची क्रिकेट टीम 17 वर्षानंतर पाकिस्तानात पोहोचली आहे. इंग्लंडची टीम येथे तीन टेस्ट मॅचची सीरीज खेळणार आहे. सीरीजची सुरुवात गुरुवारी एक डिसेंबरला रावळपिंडीमध्ये होणार आहे. सीरीज वेळेवर सुरु होण्याची शक्यता कमी आहे, असं पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने स्पष्टपणे म्हटलय. पाकिस्तानात दाखल झालेले इंग्लंडचे खेळाडू आजारी पडलेत. त्याचा परिणाम सीरीजवर होऊ शकतो. यावरुन सोशल मीडियावर पाकिस्तानच्या आयोजनावर प्रश्न निर्माण केले जातायत.
प्रॅक्टिस सेशनमध्ये फक्त इतके खेळाडू
इंग्लंडच्या खेळाडूंची तब्येत चांगली नाहीय. त्यांना काय झालय? ते अजून समजलेलं नाही. पण त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालय. संक्रमित खेळाडूंमध्ये इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सही आहे. टीमची हालत खूपच खराब आहे. म्हणूनच मॅचच्या एकदिवस आधी प्रॅक्टिस सेशनमध्ये पाच खेळाडू पोहोचले होते. हॅरी ब्रूक, जॅक क्रॉले, कीटन जेनिंग्स, ओली पोप आणि ज्यो रुट बुधवारीच रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये ट्रेनिंगसाठी पोहोचले. टीमचे बाकी सदस्य हॉटेलमध्येच थांबले होते.
The PCB and ECB are in discussions regarding the commencement of the 1st #PAKvENG Test as some England players are down with viral infection. The PCB continues to monitor the situation, is in contact with the ECB and will provide further updates in due course.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 30, 2022
पीसीबीने टि्वटमध्ये काय म्हटलय?
इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आपल्या खेळाडूंना अडचणीत आणायच नाहीय. म्हणून कदाचित रावळपिंडी कसोटी पुढे ढकलण्याची चर्चा आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने याबद्दल माहिती दिलीय. पीसीबी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डामध्ये चर्चा सुरु आहे. रावळपिंडी कसोटीच काय करायचं? यावर दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरु आहे. कारण पाहुणा संघ व्हायरल इन्फेक्शनने संक्रमित आहे. पीसीबी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं पीसीबीने टि्वटरवर म्हटलय.