PAK vs HKG: विश्वास नाही बसणार, पाकिस्तानसमोर हाँगकाँगची टीम चाळीशीच्या आत All Out

PAK vs HKG: आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानची टीम पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. रविवारी 4 सप्टेंबरला दोन्ही टीम्स मध्ये मॅच होणार आहे.

PAK vs HKG: विश्वास नाही बसणार, पाकिस्तानसमोर हाँगकाँगची टीम चाळीशीच्या आत All Out
pak vs hkgImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 7:16 AM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानची (IND vs PAK) टीम पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. रविवारी 4 सप्टेंबरला दोन्ही टीम्स मध्ये मॅच होणार आहे. आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगवर (Hong Kong)  मोठा विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने आशिया कपच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. आठवड्याभराच्या आत दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान मध्ये सामना होणार आहे.

मोठ्या फरकाने विजय मिळवला

मोहम्मद रिजवान, खुशदिल शाह आणि शादाब खानने पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानने हाँगकाँगवर 155 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. पाकिस्तानने हाँगकाँगला विजयासाठी 194 धावांचं टार्गेट दिलं होतं. पण पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर हाँगकाँगची संपूर्ण टीम फक्त 38 धावात ऑलआऊट झाली.

पाकिस्तानचा हा मोठा विजय

शारजाह मध्ये शुक्रवारी ग्रुप राऊंडचा शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळणार होता. पाकिस्तान आणि हाँगकाँगला भारताने पराभूत केलं होतं. पाकिस्तान आधीपासूनच या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार होता. त्यांनी खेळही तसाच दाखवला. पाकिस्तानने आधी विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजीच्या बळावर हाँगकाँगचा डाव झटपट गुंडाळला. टी 20 क्रिकेट मध्ये पाकिस्तानचा हा मोठा विजय आहे.

बाबर फेल, रिजवान-फखरने सावरला डाव

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. भारताविरोधात बाबरने फक्त 10 धावा केल्या होत्या. बाबरने या सामन्यात फक्त 9 धावा केल्या. तिसऱ्या ओव्हर मध्येच तो पॅव्हेलियन मध्ये परतला. ऑफ स्पिनर एहसान खानने त्याचा आपल्याच गोलंदाजीवर झेल घेतला. एहसानने दुसऱ्यांदा बाबरची विकेट काढली. त्यानंतर रिजवान आणि फखर जमांने पाकिस्तानचा डाव सावरला.

आधी धीम्या गतीने फलंदाजी केली. पण त्यानंतर रिजवान-फखरने धावगती वाढवली. दुसऱ्याविकेटसाठी 80 चेंडूत 116 धावांची भागीदारी केली. रिजवानने 43 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. फखरने 38 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली.

हाँगकाँगचे फलंदाज सुपर फ्लॉप

पाकिस्तानने 194 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हाँगकाँगचा एकही फलंदाज या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. हाँगकाँगची संपूर्ण टीम 38 धावात ऑलआऊट झाली. पाकिस्तानचा शादाब खान यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक 4 विकेट घेतले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.