PAK vs NZ: ‘हे’ पाच खेळाडू ठरवणार, T20WC ची पहिली सेमीफायनल कोण जिंकणार? पाकिस्तान की, न्यूझीलंड
PAK vs NZ: T20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल सिडनीमध्ये होणार आहे.
सिडनी: T20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल सिडनीमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सामना सुरु होईल. पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टीममध्ये होणार आहे. क्रिकेट हा टीम गेम आहे. दोन्ही टीममधल्या सर्वच खेळाडूंची भूमिका महत्त्वाची आहे. पण टी 20 वर्ल्ड कपचा पहिला फायनलिस्ट कोण असणार? त्याचा निर्णय फक्त 5 खेळाडू करु शकतात. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये कोणती टीम फायनलला पोहोचणार, ते या पाच खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
पाकिस्तानच्या टीमला नशिबाची साथ
न्यूझीलंडची टीम टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पहिली पोहोचली होती. किवी टीमने मेहनतीच्या बळावर सेमीफायनलचा टप्पा गाठला. पाकिस्तानच्या टीमला नशिबाची साथ मिळाली. त्यामुळे ते सेमीफायनलमध्ये पोहोचले. आज जी टीम सर्वोत्तम प्रदर्शन करेल, त्यांना मेलबर्नवर होणाऱ्या फायनलच तिकीट मिळेल.
NZ vs PAK कोण जिंकणार? हे पाच खेळाडू ठरवणार
तुम्ही विचार करत असाल, ते कुठले 5 खेळाडू आहेत, जे सेमीफायनलची दिशा बदलू शकतात. या पाच पैकी 3 खेळाडू न्यूझीलंडचे आहेत. 2 पाकिस्तानचे आहेत. न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहोचायच असेल, तर किवी टीमच्या त्या तीन खेळाडूंना कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल. पाकिस्तानला विजय मिळवायचा असेल, तर त्यांच्या दोन खेळाडूंनी कामगिरी उंचावण आवश्यक आहे. सिडनीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जशी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी त्यांना करुन दाखवावी लागेल.
पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेचे ते खेळाडू कोण?
न्यूझीलंडचे ते तीन आणि पाकिस्तानचे दोन खेळाडू कोण आहेत? ते जाणून घ्या. ग्लेन फिलिप्स, डेवन कॉनवे आणि टीम साऊदी हे ते तीन न्यूझीलंडचे प्लेयर आहेत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानसाठी शादाब खान आणि इफ्तिखार अहमद महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
सिडनीमध्ये असा आहे 5 खेळाडूंचा परफॉर्मन्स
न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने श्रीलंकेविरुद्ध सिडनीच्या ग्राऊंडमद्ये 64 चेंडूत 104 धावा केल्या होत्या. डेवन कॉनवेने 58 चेंडूत 92 धावांची इनिंग खेळली होती. सिडनीतच ऑस्ट्रेलिया विरुद्ध या धावा फटकावल्या होत्या. टिम साऊदीची इकॉनमी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात 2.1 ओव्हरमध्ये 2.76 ची होती. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना 89 धावांच्या फरकाने जिंकला होता.
पाकिस्तानकडून शादाब खान आणि इफ्तिखार अहमदने सिडनीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 36 चेंडूत 82 धावांची भागीदारीक केली होती. पाकिस्तानने हा सामना जिंकला होता. फलंदाजीशिवाय शादाबने गोलंदाजीत 16 धावा देऊन 2 विकेट काढल्या होत्या.