विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….
"रिजवानने यावर्षी ज्या प्रकारची फलंदाजी केलीय, ती प्रत्येक युवा फलंदाजाने पाहिली पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे" अशा शब्दात कॅप्टन बाबर आजमने रिजवानचे कौतुक केले. पाकिस्तानने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 3-0 ने जिंकली.
लाहोर: वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, विराट कोहली, (Virat kohli) एबी डिविलियर्स आणि बाबर आजम (Babar Azam) हे टी-20 क्रिकेटमध्ये धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखले जातात. मैदानावर चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा वसूल करण्याचे कौशल्य यांच्याकडे आहे. पण या आक्रमक फलंदाजांना जे शक्य झालं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने (mohammad rizwan) करुन दाखवलं आहे. मोहम्मद रिजवनाने नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध टी-20 मालिकेत 160 च्या स्ट्राइक रेटने तीन सामन्यात 203 धावा केल्या. दोन अर्धशतकं झळकवणाऱ्या रिजवानने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली.
अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना मागे सोडलं वेस्ट इंडिज विरुद्धच्या या टी-20 मालिकेत मोहम्मद रिजवानने फक्त सर्वाधिक धावाच केल्या नाहीत, तर त्याने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. असा विक्रम करणार रिजवान पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. रिजवानने ही कामगिरी करताना अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना मागे सोडलं आहे. रिजवानने 2021 या कॅलेंडर वर्षात 2000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करुन दाखवणं विराट, गेललाही जमलेलं नाही.
विराटलाही नाही जमलं मोहम्मद रिजवानने 2021 या कॅलेंडर वर्षात 2036 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर बाबर आजमचा नंबर लागतो. त्याने या वर्षात 1769 धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने 2015 साली 1665 धावा केल्या होत्या. विराटने 2016 मध्ये 1614 धावा केल्या होत्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केला, तर रिजवानने 26 डावात 1326 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. “रिजवानने यावर्षी ज्या प्रकारची फलंदाजी केलीय, ती प्रत्येक युवा फलंदाजाने पाहिली पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे” अशा शब्दात कॅप्टन बाबर आजमने रिजवानचे कौतुक केले. पाकिस्तानने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 3-0 ने जिंकली.
संबंधित बातम्या: विराट कोहलीच्या स्फोटक वक्तव्यांवर अखेर सौरव गांगुलीने सोडलं मौन Ashes 2021: हवेत झेपावून बटलरची सुपरमॅन कॅच, हा VIDEO नक्की पाहा ‘विराट आधी देशाचा विचार करं’, बोर्डाशी पंगा घेणाऱ्या कॅप्टनला मोठ्या क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला