पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवून भारताला दिली 4 चॅलेंजेस, मेलबर्नमध्ये कसं जिंकणार?

पाकिस्तानने फायनल जिंकली, तर टीम इंडियाचा प्रॅक्टिस मॅचमध्ये पराभव झालाय

पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवून भारताला दिली 4 चॅलेंजेस, मेलबर्नमध्ये कसं जिंकणार?
pakistan teamImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 4:44 PM

T20 World Cup 2022 आधी पाकिस्तानने कमाल केली आहे. या टीमने न्यूझीलंडला त्यांच्याच घरात तिरंगी मालिकेच्या (Tri Series) फायनलमध्ये हरवलं. ख्राइस्टचर्चमध्ये शुक्रवारी फायनल झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानने यजमान न्यूझीलंडवर (NZ vs PAK) 5 विकेटने विजय मिळवला.

न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 163 धावा केल्या. पाकिस्तान टीमने 3 चेंडू आधीच विजयी लक्ष्य गाठलं. पाकिस्तानच्या या विजयानंतर टीम इंडियासमोर आता 4 चॅलेंजेस निर्माण झाली आहेत. दोन्ही टीम्समध्ये 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये टी 20 वर्ल्ड कपची मॅच होणार आहे.

बाबर-रिजवान जोडीपासून धोका

टी 20 वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियासाठी बाबर आजम आणि मोहम्मद रिजवानची जोडी सर्वात मोठी समस्या आहे. हे दोन्ही फलंदाज विकेटवर टिकून फलंदाजी करतात. बाबर-रिजवान जोडीला झटपट बाद करणं टीम इंडियासाठी आवश्यक असेल. न्यूझीलंडमधल्या तिरंगी मालिकेत या जोडीने 2 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. यात एक शतकी भागीदारी आहे.

मिडिल ऑर्डरच्या फलंदाजांनी 2 मॅच जिंकून दिल्या

पाकिस्तानसाठी त्यांच्या मिडिल ऑर्डरने चिंता वाढवली होती. मागच्या दोन सामन्यात त्यांच्या मिडिल ऑर्डरच्या फलंदाजांनी विजय मिळवून दिला आहे. मोहम्मद नवाजला पाकिस्तानने दोनवेळा चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरवलं. दोन्ही वेळा पाकिस्तानची टीम जिंकली. नवाजने फायनलमध्ये 22 चेंडूत 38 धावा ठोकल्या. याआधी बांग्लादेश विरुद्ध 20 चेंडूत 45 धावा फटकावून विजय मिळवून दिला होता. नवाजची मिडिल ऑर्डरमधील फलंदाजी पाकिस्तानसाठी ताकत बनली आहे. टीम इंडियासाठी निश्चित हे चिंताजनक आहे.

हॅरिस रौफ फॉर्ममध्ये

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 2 विकेट काढल्या. रौफने डेथ ओव्हर्समध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. रौफचा चांगला फॉर्म टीम इंडियाची डोकेदुखी आहे. शाहीन शाह आफ्रिदी फिट

टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्याव्दारे शाहीन शाह आफ्रिदी मैदानावर पुनरागमन करेल. हा खेळाडू आता पूर्णपणे फिट आहे. शाहीनच पुनरागमन टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. शाहीन नवा चेंडू चांगला स्विंग करु शकतो.

आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.