भारताचा किती द्वेष करणार पाकिस्तान? वर्ल्ड कपच्या जर्सीवर तिसऱ्याच देशाचं नाव

आयपीएल संपताच लगेचच 17 ऑक्टोबरपासून युएईमध्येच आगामी टी20 विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.14 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल.

भारताचा किती द्वेष करणार पाकिस्तान? वर्ल्ड कपच्या जर्सीवर तिसऱ्याच देशाचं नाव
पाकिस्तानची जर्सी आगामी टी20 विश्वचषकासाठी
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 5:53 PM

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा आगामी टी-20 विश्वचषकाकडे (ICC T20 World Cup) संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे. आयसीसीने (ICC) सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच भारतीय संघही जाहीर केला. दरम्यान या स्पर्धेत सर्वांत मोठं आकर्षण म्हटलं तर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs pakistan) यांच्यात होणारा सामना हेच आहे. अगदी फायनच्या सामन्यापेक्षा अधिक क्रेज या सामन्याचं आहे.

हे दोन्ही देश आपआपसांतील संबधामुळे एकेमेकांचे दौरे करत नसल्याने अशा मोठ्या स्पर्धांतच एकमेकांशी भिडतात. पण पाकिस्तानने त्यांची चिडकी वृत्ती अद्यापही सोडली नसून वर्ल्ड कपच्या जर्सीवर यजमान असणाऱ्या भारताच्या (India 2021) जागी सामने पार पडणार असलेल्या युएईचं (UAE 2021) नाव लिहिलं आहे. विशेष म्हणजे इतर सर्व संघानी भारताचं नाव लिहिलं असतानाही पाकिस्तानने अशाप्रकारे भारताचा द्वेष करण्यासाठी हे कृत्य केलं आहे. पाकिस्तानच्या या जर्सीमध्ये त्यांचा कर्णधार बाबर आजमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले असून काही नेटकऱ्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

अनेक नेटकऱ्यांनी इतर विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघाच्या जर्सीचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे फोटो दिसत असून त्यांच्या जर्सीवर मात्र Indian 2021 लिहिण्यात आले आहे.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद अफ्रिदीने शेअर केला विराटचा व्हिडीओ, म्हणाला…

T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराची कमाल, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला, विराटलाही मागे टाकत बाबरने रचला इतिहास

T20 WC 2021 : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत वाढली, स्टेडियममधील फॅन्सच्या एंट्रीला ग्रीन सिग्नल

(Pakistan wrote UAE 2021 instead of India 2021 on their jersey For T20 World Cup)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.