Australia vs Pakistan: ऑस्ट्रेलियासमोर विजय मिळवणं पाकिस्तानसाठी अवघड, वाचा काय आहे कारण?

न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार असून विजेता संघ न्यूझीलंडशी फायनलमध्ये भिडेल.

Australia vs Pakistan: ऑस्ट्रेलियासमोर विजय मिळवणं पाकिस्तानसाठी अवघड, वाचा काय आहे कारण?
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 5:52 PM

दुबई: टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आज सेमीफायनलचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) या संघात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी सर्व शक्य प्रयत्न करणार हे नक्की. त्यात पाकिस्तान संघासाठी मात्र आजची लढत अतिशय अवघड ठरणार आहे. याचे कारणही आतापर्यंतचे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघातील सामनेच आहेत.

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानच्या संघाची कामगिरी सर्वात भारी आहे. सुपर 12 फेरीत  5 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह त्यांनी ही फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे ग्रुप 1 मधून आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने नेही 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे. आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे संघ आमने-सामने भिडणार आहेत. पण आतापर्यंतचा विश्वचषकातील दोघांचा आमना-सामना पाहता पाकिस्तानसाठी विजय मिळवणं मोठं आव्हान असणार आहे.

पाकिस्तानसाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान अवघड

पाकिस्तानी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकात विजय मिळवलेला नाही. 1987 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने मात दिली होती. त्यानंतर 1999 फायनलमध्येही पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले होते. 2010 टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. 2015 वर्ल्ड कपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने मात दिली. त्यामुळे आजही पाकिस्तानला विजय मिळवताना मेहनत करावी लागणार हे नक्की.

आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ

पाकिस्तान संघ: मोहम्मद रिजवान, बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, हैदर अली, शाहीन आफ्रीदी

ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, आरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्च, अॅडम झाम्पा, जोश हॅजलवुड.

इतर बातम्या

England vs New Zealand T20 world cup Result: चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडची इंग्लंडवर सरशी, 5 विकेट्सने मात देत मिळवली अंतिम सामन्यात जागा

विराट कोहलीच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची हैद्राबादमध्ये कारवाई, आरोपी आहे IIT पासआऊट

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(Pakistans world cup record against australia is very bad they may loose today)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.