T20 Vitality Blast | झमन खानची सेम मलिंगा स्टाइल, गोळीसारखा यॉर्कर, बघा बॅट्समनच काय झालं? VIDEO
T20 Vitality Blast | पाकिस्तानमध्ये एक नवीन युवा वेगवान गोलंदाज उदयाला येतोय. त्याने इंग्लंडच्या T20 टुर्नामेंटमध्ये आपली शक्ती दाखवून दिली. त्याने गोळीसारखा यॉर्कर काय असतो, ते दाखवलं.
लंडन : सध्या इंग्लंडमध्ये T20 Vitality Blast टुर्नामेंट सुरु आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे अनेक खेळाडू खेळतायत. याच स्पर्धेतील एका सामन्यात श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची आठवण झाली. झमन खान या पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाने मलिंगाची आठवण करुन देणारा खतरनाक यॉर्कर चेंडू टाकला. डर्बीच्या काऊंटी ग्राऊंडवर डर्बिशायर आणि वॉर्कशायरमध्ये सामना सुरु होता. त्यावेळी डर्बिशायरकडून खेळणाऱ्या झमन खानने वॉर्कशायरचा फलंदाज जॅक हेन्सला जबरदस्त यॉर्कर टाकला.
T20 Vitality Blast टुर्नामेंटमध्ये वॉर्कशायरचा कॅप्टन ब्रेट डी ने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन ब्रेट आणि जॅक हेन्सने टीमला जबरदस्त सुरुवात दिली.
मिचेल सेंटनरने डाव सावरला
दोघांनी 3.4 ओव्हर्सध्ये 45 धावांची सलामी दिली. झॅक चॅपलने ब्रेटला आऊट करुन ही जोडी फोडली. त्यानंतर न्यूझीलंडचा खेळाडू मिचेल सेंटनर जॅक हेन्सच्या साथीला आला. वॉर्कशायरसाठी दोघांनी मिळून चांगली भागीदारी केली.
लसिथ मलिंगाची आठवण
त्यांची 72 धावांची पार्टनरशिप पाकिस्तानी गोलंदाज झमन खानने ब्रेक केली. 13 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर त्याने ही जोडी फोडली. झमन खानने जो यॉर्कर चेंडू टाकला. त्याने लसिथ मलिंगाची आठवण आली.
धावांचा डोंगर
झमन खानने या मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 2 विकेट काढल्या. वॉर्कशायरने 222 धावा केल्या. मिचेल सँटनरने सर्वाधिक 64 धावा केल्या. यात चार फोर आणि पाच सिक्स होते.
Zaman Khan with an elite yorker ? #Blast23 pic.twitter.com/NiBPxfHK52
— Vitality Blast (@VitalityBlast) July 4, 2023
223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डर्बिशायरची सुरुवात चांगली झाली नाही. हॅरी आणि वने मॅडसेन यांनी 72 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर डर्बिशायरचा डाव कोसळला. 194 धावांवर डाव आटोपला. 28 धावांनी त्यांचा पराभव झाला. या विजयामुळे वॉर्कशायर तिसऱ्या स्थानावर आहे. डर्बिशायर चौथ्या स्थानावर आहे.