Parthiv Patel on Virat Kohli: ‘नीम पत्ता और सच…’, 24 तासात दुसऱ्यांदा विराटवर हल्लाबोल

Parthiv Patel on Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी विकेटकीपर पार्थिव पटेल (Parthiv patel) विराट कोहली (Virat Kohli) बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

Parthiv Patel on Virat Kohli: 'नीम पत्ता और सच...', 24 तासात दुसऱ्यांदा विराटवर हल्लाबोल
पार्थिव पटेल-विराट कोहली Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 2:53 PM

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी विकेटकीपर पार्थिव पटेल (Parthiv patel) विराट कोहली (Virat Kohli) बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit bumrah) करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विराट कोहलीने त्याला कसं कमी लेखलं होतं, त्याचा किस्सा पार्थिवने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितला. तेव्हापासून पार्थिव पटेल चर्चेमध्ये आहे. पार्थिव पटेल त्यावेळी गुजराचा कॅप्टन होता. जसप्रीत बुमराह त्याच्या नेतृत्वाखील गुजरातच्या रणजी संघातून खेळत होता. बुमराहची गोलंदाजी पार्थिवने बघितली होती. पार्थिव आणि विराट त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एकत्र खेळायचे. पार्थिवने त्यावेळी विराट बरोबर चर्चा करताना त्याला बुमराहचं नाव सुचवलं होतं. त्यावर विराटने ‘बुमराह-वुमराह क्या करेंगा’ असं म्हटलं होतं. पार्थिवची ही मुलाखत सध्या मीडियामध्ये गाजत आहे.

पार्थिवने पुन्हा कोणासाठी केलं टि्वट?

पार्थिवने सांगितलेला हा किस्सा विराटच्या चाहत्यांना आवडला नाही. सोशल मीडियावर विराटची मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्यांनी पार्थिव पटेलवर टीका सुरु केली. त्यानंतर पार्थिवने पुन्हा एक टि्वट केलं आहे. यामध्ये त्याने ‘नीम पत्ता और सच दोनो कडवा हैं’ असं टि्वट केलय.

सीजनच्या मध्यावरच त्याला घरी पाठवण्याची चर्चा

“बुमराहची गुजरातच्या रणजी संघात निवड झाली. ते दोन ते तीन वर्ष रणजीमध्ये खेळला. 2013 मध्ये त्याने रणजीत खेळायला सुरुवात केली. 2014 सीजन त्याच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. 2015 च्या सीजनमध्ये तो फार काही चमक दाखवू शकला नाही. त्यावेळी सीजनच्या मध्यावरच त्याला घरी पाठवण्याची चर्चा सुरु होती. पण हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा दिसली. मुंबई इंडियन्सने त्याला पाठिंबा दिला. बुमराहची स्वत:ची मेहनत आणि लाभलेल्या पाठिंब्यामुळे त्याच्यातला सर्वोत्तम खेळ समोर आला” असं पार्थिव पटेलने सांगितलं.

विराट कोहलीच पहिली विकेट

जसप्रीत बुमराहने आधीच 2013 साली मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केला होता. विराट कोहलीच जसप्रीत बुमराहचा पहिला विकेट होता. विराट कोहलीने 2013 साली RCB ची कॅप्टनशिप स्वीकारली. 2021 पर्यंत तो RCB चा कॅप्टन होता. या इतक्या वर्षात विराटला आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवून देता आले नाही. पार्थिव पटेल जो आता सर्व फॉर्मेटमधून निवृत्त झालाय, एकवेळ तो या संघाचा मुख्य भाग होता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.