RR vs KKR IPL 2022: दोघांनी मिळून घेतली एक कॅच, पहा बाउंड्रीवरील अफलातून झेल VIDEO, तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त

RR vs KKR IPL 2022: आज IPL चा 30 वा सामना आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (KKR vs RR) लढत सुरु आहे.

RR vs KKR IPL 2022: दोघांनी मिळून घेतली एक कॅच, पहा बाउंड्रीवरील अफलातून झेल VIDEO, तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त
अफलातून झेल Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 10:45 PM

मुंबई: आज IPL चा 30 वा सामना आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (KKR vs RR) लढत सुरु आहे. आजच्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने (Jos buttler) तुफान बॅटिंग केली. त्याने 61 चेंडूत 103 धावांची शतकी खेळी केली. यात नऊ चौकार आणि पाच षटकार होते. बटलरच सीजनमधील हे दुसरं शतक आहे. जोस बटलरच्या तुफानामुळे आज कोलकाता नाइट रायडर्सला मैदानावर सेलिब्रेशन करण्याची फारशी संधी मिळाली नाही. शेवटच्या चार-पाच षटकात केकेआरने राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीला थोडा लगाम घातला. पॅट कमिन्सला त्याच्या शेवटच्या षटकात जोस बटलरचा मोठा विकेट मिळाला. कमिन्सने आज गोलंदाजीत विशेष चमक दाखवली नाही. त्याने चार षटकात 50 धावा देत फक्त एक विकेट मिळवला.

फिल्डिंगने प्रभावित केलं

कमिन्सने आज फिल्डिंगमध्ये मात्र आपल्या चपळाईने प्रभावित केलं. कमिन्सने आयपीएल 2022 मधली सर्वोत्तम कॅच पकडली. शिवम मावी सोबत मिळून त्याने हा झेल घेतला. 18 व्या षटकात सुनील नरेनच्या गोलंदाजीवर लाँग ऑनवर हा झेल घेतला. सुनील नरेन 18 व षटक टाकत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर रियान परागने मोठा फटका खेळला. चेंडू सीमारेषेपार पाठवायचा होता. पराग लॉफ्टेड शॉट खेळला. पण त्याला बॉल टाइम करता आली नाही.

दोघे झेल घेण्यासाठी धावले

कमिन्स आणि मावी दोघे झेल घेण्यासाठी धावले. कमिन्सने सीमारेषेवर रियान परागचा झेल घेतला. पण त्याचवेळी कमिन्स बाउंड्रीलाइन क्रॉस करणारा होता. त्यामुळे त्याने सीमारेषेजवळ असलेल्या शिवम मावीच्या दिशेने चेंडू फेकला. मावीने तो एकाहाताने पकडला. अशा पद्धतीने दोघांनी मिळून रियान परागची कॅच घेतली. शेवटच्या डेथ ओव्हर्समध्ये ही विकेट मिळाली. जोस बटलरच्या शतकाच्या बळावर राजस्थानने पाच बाद 217 अशी विशाल धावसंख्या उभारली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.