IND vs AUS : तिसऱ्या टेस्टमधून ‘हे’ 4 प्लेयर बाहेर, आता टीमसाठी Playing 11 निवडणं बनलं कठीण

IND vs AUS 3rd Test Match : इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा तिसरा कसोटी सामना होईल. दिल्ली टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाला एक आठवड्याचा ब्रेक मिळाला होता. तिसरी कसोटी जिंकून सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

IND vs AUS : तिसऱ्या टेस्टमधून 'हे' 4 प्लेयर बाहेर, आता टीमसाठी Playing 11 निवडणं बनलं कठीण
ind vs aus 3rd test
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 10:27 AM

IND vs AUS 3rd Test Match : बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरु होणार आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा तिसरा कसोटी सामना होईल. दिल्ली टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाला एक आठवड्याचा ब्रेक मिळाला होता. तिसरी कसोटी जिंकून सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलिया सीरीजमधील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या कसोटीपूर्वी 4 मॅच विनर खेळाडू बाहेर गेले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स सीरीजच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. तो मायदेशी ऑस्ट्रेलियात परतलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमिन्सच्या आईची तब्येत चांगली नाहीय. आता स्टीव्ह स्मिथ नेतृत्व करणार आहे. स्मिथची 2021 मध्ये उपकर्णधारपदी निवड झाली. त्यानंतर त्याने दोन टेस्ट मॅचमध्ये टीमच नेतृत्व केलं. एडिलेडमध्ये कसोटी सामना झाला होता.

डेविड वॉर्नरच्या जागी कोणाला संधी?

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक ओपनर डेविड वॉर्नर दुखापतीमुळे उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीय. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजचा एक चेंडू डेविड वॉर्नरच्या हेल्मेटला लागला. डेविड वॉर्नर दुखापतीमुळे पूर्ण टेस्ट सीरीजमध्ये खेळू शकणार नाहीय. दिल्ली टेस्टमध्ये त्याच्याजागी मॅट रेनशॉ चा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. पुढच्या दोन कसोटीत त्याला संधी मिळू शकते.

या गोलंदाजी कमतरता जाणवेल

ऑस्ट्रेलियन टीमचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड सुद्धा सीरीजला मुकणार आहे. जोश हेजलवूड अकिलिसच्या दुखापतीमधून अजूनपर्यंत पूर्णपणे सावरु शकलेला नाही. मागच्या महिन्यात गोलंदाजी करताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. भारत दौऱ्यात पहिल्या दोन कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. एका खेळाडूला केलं रिलीज

ऑस्ट्रेलियन स्पिन गोलंदाज एश्टन एगरला सुद्धा सीरीजच्या मध्यावर रिलीज केलय. त्याला सुद्धा सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी एश्टन एगरला रिलीज करण्यात आलय. एश्टन एगर देशांतर्गत सीजनच्या शेवटच्या टप्प्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.