PAK vs AUS Test: Pat Cummins च्या ‘या’ क्लासिक यॉर्करसमोर बिचाऱ्या मोहम्मद रिझवानचा तरी कसा निभाव लागेल? पहा VIDEO
PAK vs AUS Test: पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या (PAK vs AUS, 3rd Test) अखेरच्या दिवशी पॅट कमिन्सने (Pat Cummins yorker) भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं.
लाहोर: पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या (PAK vs AUS, 3rd Test) अखेरच्या दिवशी पॅट कमिन्सने (Pat Cummins yorker) भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने प्रतिभावान फलंदाज मोहम्मद रिझवानला ज्या पद्धतीने बाद केलं, त्याला तोड नाही. रिझवानकडे पॅट कमिन्सच्या यॉर्कर चेंडूच कुठलही उत्तर नव्हतं. कमिन्सने रिझवानला (Mohammad rizwan) आऊट केलं, त्या चेंडूचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाकिस्तानच्या दुसऱ्याडावात रिझवान विशेष काही करु शकला नाही. त्याला खात सुद्धा उघडता आलं नाही. फवाद आलमचा विकेट गेल्यानंतर मोहम्दम रिझवान क्रीजवर आला होता. फक्त सहा चेंडूंमध्ये पॅट कमिन्सने मोहम्मद रिझवानचा खेळ संपवला. पॅट कमिन्सने 71 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला यॉर्कर चेंडू टाकला. चेंडू थेट रिझवानच्या पॅड्सवर जाऊन आदळला. अंपायरने क्षणाचाही विलंब न लावता रिझवानला आऊट दिलं. रिझवानलाच स्वत:च्या बाद असण्याची इतकी खात्री होती की, त्याने रिव्यू सुद्धा घेतला नाही. आपण स्टंम्पसच्या रेषेत असल्याचं रिझवानला माहित होतं.
रिझवान लाहोर टेस्टमध्ये फेल
मोहम्मद रिझवान दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. लाहोर कसोटीच्या दोन्ही डावात तो अपयशी ठरला. पहिल्या डावात रिझवान अवघ्या एक रन्सवर तंबूत परतला होता. पहिल्या डावात मिचेल स्टार्कने जबरदस्त रिव्हर्स स्विंगवर क्लीन बोल्ड केलं होतं. तो चेंडूच इतका अप्रतिम होता की, रिझवान हतबल ठरला.
Rizwan walks out. Big wicket for Australia. #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/qMxwx3s29D
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 25, 2022
पॅट कमिन्स जबरदस्त फॉर्ममध्ये
पॅट कमिन्स लाहोर कसोटीत आपल्या वेगवान गोलंदाजीने पाकिस्तानच्या संघावर भारी पडला. पहिल्याडावात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने पाच विकेट घेतल्या होत्या. त्यावेळी अजहर अलीचा आपल्याच गोलंदाजीवर ज्या पद्धतीने झेल घेतला, ते खरोखरच कौतुकास्पद होतं. पॅट कमिन्सने जवळपास 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली.