Pat Cumminss: कमिन्सने उस्मान ख्वाजाच्या मुस्लिम धर्माचा मान ठेवला, मैदानावरच्या कृतीने मन जिंकलं, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलियाच्या या जबरदस्त कामगिरीबद्दल कर्णधार पॅट कमिन्सच (Pat Cumminss) सर्वत्र कौतुक होत असतानाच मैदानावरील त्याच्या एका कृतीने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत.
मेलबर्न: अॅशेस मालिकेत (Ashes Series) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 4-0 ने धुळ चारली. ऑस्ट्रेलियाच्या या जबरदस्त कामगिरीबद्दल कर्णधार पॅट कमिन्सच (Pat Cumminss) सर्वत्र कौतुक होत असतानाच मैदानावरील त्याच्या एका कृतीने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. संघ विजयी जल्लोषात रमलेला असताना कमिन्सने सहकाऱ्यासाठी केलेली कृती खरोखरच कौतुकास्पद आहे. इंग्लंड विरुद्धची मालिका 4-0 ने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ शॅम्पेन उडवण्याच्या तयारीत होता. पण कमिन्सने सर्वांना असं करण्यापासून रोखलं.
कमिन्सने का रोखलं? ऑस्ट्रेलियाच्या या विजयी संघात उस्माम ख्वाजा सुद्धा होता. तो मुस्लिम आहे. शॅम्पेन म्हणजेच दारुचा प्रकार असल्याने उस्मान ख्वाजा सेलिब्रेशन पासून लांब होता. मैदानावर ही गोष्ट जेव्हा कमिन्सच्या लक्षात आली, तेव्हा त्याने सहकाऱ्यांना शॅम्पेन उडवण्यापासून रोखले व उस्माम ख्वाजा फोटो काढण्यासाठी बोलावले. उस्माम ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन संघात खेळणारा पहिला मुस्लिम क्रिकेटपटू आहे.
तो सेलिब्रेशनपासून लांब उभा होता
या कसोटी क्रिकेटमध्ये त्याने जोरदार कमबॅक केलं. चौथ्या सामन्यात त्याने सलग दोन शतकं झळकावली. उस्मान ख्वाजा धार्मिक गोष्टींचे पालन करतो. दारु अंगावर शिंपडली जाऊ नये, यासाठी तो सेलिब्रेशनपासून लांब उभा होता. म्हणून कमिन्सने सहकाऱ्यांना शॅम्पेन फोडण्यापासून रोखलं आणि उस्मानला विजयी जल्लोषात सहभागी करुन घेतलं. उस्मान ख्वाजा अॅशेस मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला. “उस्मान मुस्लिम आहे. त्यामुळे शॅम्पेन अंगावर उडवलेली त्याला आवडणार नाही” असे कमिन्सने सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत पॅट कमिन्सने सर्वाधिक विकेट घेतल्या.
कमिन्सच्या कृतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहाने सुद्धा कमिन्सचा कौतुक केलं.
This might be a small gesture but this is what makes Pat Cummins great. He realised Khawaja had to dip because of the booze and rectifies it. pic.twitter.com/GNVsPGJhfK
— Fux League (@buttsey888) January 16, 2022
चांगला लीडर आपल्या संपूर्ण टीमची काळजी घेतो व प्रत्येकाचा समान आदर करतो. पॅट कमिन्स तसा लीडर आहे असं पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या: IND vs SA : एकदिवसीय मालिकेत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या उभय संघांची आतापर्यंतची कामगिरी रोहित शर्मा होणार टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार, मात्र BCCI ची हिटमॅनसमोर महत्त्वाची अट सरावासाठी रोज पुणे-मुंबई प्रवास, भाड्याच्या घरात राहून सराव, लोणावळ्याच्या पठ्ठ्याचा U-19 World Cup मध्ये धुमाकूळ
(Pat Cumminss gesture towards Usman Khawaja after Ashes victory wins hearts)