IPL 2023 : ‘तुम्हीच फलंदाजांना सांगताय की….’, Wasim Akram अर्शदीप सिंगवर खवळला

IPL 2023 : हाय स्कोरिंग मॅचमधील परफॉर्मन्सवरुन पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने पंजाब किंग्सच्या दोन्ही गोलंदाजांना चांगलच सुनावलं.

IPL 2023 : 'तुम्हीच फलंदाजांना सांगताय की....', Wasim Akram अर्शदीप सिंगवर खवळला
Wasim AKram Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 1:49 PM

लाहोर : पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये झालेल्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. आयपीएल इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. लखनौने 20 ओव्हर्समध्ये 257/5 धावा चोपल्या. पंजाब किंग्सने सुद्धा या लक्ष्याच पाठलाग करताना चांगली मजल मारली. त्यांनी 202 धावा फटकावल्या. पंजाब किंग्सचे अर्शदीप सिंग आणि कागिसो रबाडा महागडे गोलंदाज ठरले. दोघांनी त्यांच्या 4 ओव्हरच्या कोट्यामध्ये 50 पेक्षा जास्त धावा दिल्या.

अर्शदीपने 54 धावा देऊन 1 विकेट आणि राबाडने 52 धावा देऊन 2 विकेट काढल्या. या परफॉर्मन्सवरुन पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने पंजाब किंग्सच्या दोन्ही गोलंदाजांना चांगलच सुनावलं. “हे दोन्ही गोलंदाज आपल्या बॉलिंगमध्ये काही वैविध्य दाखवत होते की, पावर हिटिंग करणाऱ्या फलंदाजांची मदत करत होते” असा प्रश्न वसिम अक्रमने उपस्थित केलाय.

आजच्या जमान्यात मी बॉलिंग केली असती, तर….

“आमच्यावेळी बोर्डावर 257 धावा असल्या की, जिंकायचो. T20 क्रिकेट हे बॉलर्ससाठी कठीण आहे, हे मी समजू शकतो. पण, मी आजच्या जमान्यत बॉलिंग करत असतो, ठराविक रन-अप आणि साइडवरुन मला मार बसला असता, तर मी रनअप आणि गोलंदाजीत काही बदल केले असते” असं अक्रम स्पोर्ट्सकीडावर बोलताना म्हणाला.

अक्रमच निरीक्षण काय?

“ड्वेयन ब्राव्हो सोडल्यास, राऊंड द विकेट यॉर्कर बॉलिंग करणारे मी फार बॉलर्स बघितलेले नाहीत. नियमित सरावानेच हे जमू शकतं. फलंदाजाच्या मनात तुम्हाला संशय निर्माण करता आला पाहिजे. हे दोघे त्यात कमी पडतायत” असं अक्रम म्हणाला.

दोघांनी 8 ओव्हर्समध्ये किती धावा दिल्या?

“रबाडा आणि अर्शदीपने 8 ओव्हर्समध्ये 106 धावा दिल्या. तुम्ही फुलटॉस टाकताय की, तुम्ही फलंदाजांना आधीच सांगताय, मी इथे बॉल टाकणारय, मला सिक्स मारा. बॉलर्सना मार पडतो, हे मला माहितीय, पण ही चूक आहे” असं अक्रम म्हणाला.

लखनौ सुपर जायंट्सचे ओपनर काइल मेयर्स (54) आणि मार्कस स्टॉयनिस (72) यांनी अर्धशतकं फटकावली. निकोलस पूरनने 236.84 च्या स्ट्राइक रेटने 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या. लखनौकडून खेळणारा अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हकने विजयात महत्वाची भूमिका बजावली. चार ओव्हर्समध्ये 30 धावात 3 विकेट काढून त्याने महत्वाची भूमिका बजावली.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.