Mumbai Indians IPL 2023 : विकत घेऊन संपूर्ण सीजन बसवलं, त्यानेच मुंबई इंडियन्सशी घेतला बदला, VIDEO

Mumbai Indians IPL 2023 : त्याने मुंबईच्या बॉलर्सना ठोकून काढलं. मुंबई इंडियन्सने या खेळाडूला विकत घेतलं होतं. पण या टॅलेंटेड प्लेयरला संधी दिली नाही. आता तो पंजाबकडून धमाकेदार खेळ दाखवतोय.

Mumbai Indians IPL 2023 : विकत घेऊन संपूर्ण सीजन बसवलं, त्यानेच मुंबई इंडियन्सशी घेतला बदला, VIDEO
IPL 2023 Mumbai IndiansImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 7:56 AM

मोहाली : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये बुधवारी सामना झाला. आयपीएलमधील हा 46 वा सामना होता. या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला. पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग केली. पंजाबच्या बॅट्समन्सनी मुंबईच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. पंजाबने या मॅचमध्ये विशाल धावसंख्या उभारली. भले, मुंबई इंडियन्सने 19 व्या ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. पण पंजाब किंग्सने मुंबईसमोर चांगलं आव्हान निर्माण केलं होतं.

लियाम लिव्हिंगस्टोनप्रमाणे पंजाबच्या आणखी एका फलंदाजाने मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. त्यामुळे पंजाब किंग्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 214 धावांचा डोंगर उभा केला.

त्याने 5 फोर, 2 सिक्स मारले

लियाम लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 82 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स मारले. त्याच्या खालोखाल जितेश शर्माने मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं. जितेशने 27 चेंडूत 49 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 5 फोर, 2 सिक्स मारले.

लांब-लांब सिक्स मारतोय

पंजाब किंग्सचा युवा विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा या सीजनमध्ये जबरदस्त खेळतोय. जितेश जेव्हा मैदानावर उतरतो, तेव्हा लांब-लांब सिक्स मारतोय. या सीजनमध्ये तो प्रत्येक मॅचमध्ये अशीच कामगिरी करतोय. मुंबई इंडियन्स विरुद्ध बुधवारी त्याने असाच खेळ दाखवला. मुंबईच्या बॉलर्सचा त्याने चांगलाच समाचार घेतला.

मागच्या सीजनमध्ये सुद्धा त्याची शानदार बॅटिंग

जितेशने मुंबईच्या प्रत्येक बॉलरला कुटलं. तो पाचव्या नंबरवर बॅटिंगसाठी उतरायचा. लिव्हिंगस्टोनसोबत मिळून त्याने शतकी भागीदारी साकारली. पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 214 धावा केल्या. जितेशने आपल्या बॅटची ताकत दाखवण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी मागच्या सीजनमध्ये सुद्धा त्याने शानदार बॅटिंग केली होती. जितेशने मागच्या सीजनमध्ये 12 सामन्यात 163.64 च्या स्ट्राइक रेटने 234 धावा केल्या होत्या.

केविन पीटरसन-रवीशास्त्री त्याच्याबद्दल काय म्हणाले?

जितेशने आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केलय. इंग्लंडच्या केविन पीटरसनने त्याचं भरपूर कौतुक केलं. टीम इंडियात ऋषभ पंतच पर्याय म्हणून त्याचा उल्लेख केला. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी सुद्धा जितेशच कौतुक केलं. जितेश या सीजनमधील शोध असल्याच शास्त्री इएसपीएन क्रिकइन्फोवर म्हणाले.

जितेश कधीही भारतीय टीममध्ये येऊ शकतो, असं सुद्धा शास्त्री म्हणाले. जितेशची विकेटकीपिंग आणि बॅटिंग दोन्ही चांगलं असल्याचं शास्त्री म्हणाले. जितेशने बुधवारी त्याच टीम विरोधात धावा कुटल्या, ज्यांनी त्याला एक वर्ष बसवून ठेवलं. मुंबई इंडियन्सने जितेशला आयपीएल 2021 मध्ये विकत घेतलं होतं. पण एकाही मॅचमध्ये खेळवलं नाही. याआधी सुद्धा 22 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सची टीम आमने-सामने होती. त्या मॅचमध्ये सुद्धा जितेशने 7 चेंडूत 4 सिक्स मारुन 25 धावा केल्या होत्या. पंजाबने ही मॅच 13 रन्सनी जिंकली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.