PBKS vs RR Live Score, IPL 2021 : अखेरच्या षटकात कार्तिकची कमाल, चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा अप्रतिम विजय

| Updated on: Sep 22, 2021 | 12:05 AM

PBKS vs RR Live Score in Marathi: पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज दुबईच्या मैदानात आमने-सामने भिडणार आहेत. या लढीकडे सर्वांचच लक्ष लागून आहे.

PBKS vs RR Live Score, IPL 2021 : अखेरच्या षटकात कार्तिकची कमाल, चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा अप्रतिम विजय
मयांक अगरवाल

IPL 2021 : आयपीएलच्या स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना सुरु आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाबने गोलंदाजी निवडली. राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी आणि लुईसने उत्तम सुरुवात केली. त्यानंतर महिपालने देखील धाकड फलंदाजी करत 43 धावा केल्या. पण पंजाबकडून युवा अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी करत 5 विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानचा संघ 185 धावांवर सर्वबाद झाला आणि पंजाबला विजयासाठी 186 धावांची गरज होती. अशावेळी पंजाबचे सलामीवीर मयांक आणि राहुल यांनी उत्तम सुरवात करत शतकी भागिदारी केली. त्यानंतर पुरन आणि मार्करम यांनी उर्वरीत जबाबदारी पार पाडली देखील. पण अखेरच्या षटकात राजस्थानचा युवा गोलंदाज कार्तिक त्यागीने अप्रतिम अशा दोन विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Sep 2021 11:42 PM (IST)

    PBKS vs RR: चुरशीच्या सामन्यात राजस्थान 2 धावांनी विजयी

    अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी केवळ 4 धावांची गरज होती. पण यावेळी केवळ 1 रन देत राजस्थानच्या कार्तिक त्यागीने अप्रतिम गोलंदाजी करत दोन विकेटही घेतल्या. त्यामुळे राजस्थानचा संघ 2 धावांनी विजयी झाला.

  • 21 Sep 2021 11:35 PM (IST)

    PBKS vs RR: सामना उत्कठांवर्धक स्थितीत

    अखेरच्या 3 चेंडूत पंजाबला विजयासाठी 3 धावांची गरज आहे.

  • 21 Sep 2021 11:22 PM (IST)

    17 व्या षटकात पूरनचा हल्लाबोल

    17 व्या षटकात निकोलस पूरनने मुस्तफिजरू रहमानवर हल्लाबोल करत एक षटकार आणि चौकाराच्या मदतीने 14 धावा लुटल्या. पंजाबला विजयासाठी तीन षटकात 18 धावांची आवश्यकता (पंजाब 168/2)

  • 21 Sep 2021 11:15 PM (IST)

    मार्क्रम आणि पूरनने मोर्चा सांभाळला

    दोन्ही सलामीवीर लागोपाठ बाद झाल्यानंतर एडन मार्क्रम (14) आणि निकोलस पूरनने (15) 28 धावांची भागीदारी करत मोर्चा सांभाळला आहे. पंजाबला आता 4 षटकात 32 धावांची आवश्यकता. (पंजाब 154/2)

  • 21 Sep 2021 10:59 PM (IST)

    PBKS vs RR: मयांक अगरवाल बाद!

    पंजाबचा कर्णधार केएल राहुल बाद होताच सेट फलंदाज मयांक अगरवालही बाद झाला आहे. राहुल तेवतियाच्या चेंडूवर लियमने त्याचा झेल घेतला आहे.

  • 21 Sep 2021 10:51 PM (IST)

    PBKS vs RR: तीन जीवदानानंतर राहुल बाद!

    सुरुवातीपासून तीन जीवदान मिळालेला केएल राहुल अखेर बाद झाला आहे. चेतन साकरियाच्या गोलंदाजीवर कार्तिक त्यागीने त्याचा झेल घेतला आहे. राहुलचं अर्धशतक एका धावेने हुकलं.

  • 21 Sep 2021 10:37 PM (IST)

    PBKS vs RR: मयांक अगरवालचं अप्रतिम अर्धशतक

    पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवालने धमाकेदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. त्याने केवळ 34 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. 6 चौकार आणि 2 षटकार त्याने ठोकले आहेत.

  • 21 Sep 2021 10:26 PM (IST)

    PBKS vs RR: मयांक अगरवालची चौक्यांची हॅट्रिक

    पंजाबता सलामीवीर मयांक अगरवालने 8 व्या षटकात कार्तिक त्यागीला लागोपाठ तीन चौकार लगावले आहेत.

  • 21 Sep 2021 10:08 PM (IST)

    PBKS vs RR: केएल राहुल @3000

    पंजाबचा कर्णधार केएल राहुलने 3000 आयपीएल धावा पूर्ण केल्या आहेत.

  • 21 Sep 2021 10:07 PM (IST)

    PBKS vs RR: पंजाबचा कर्णधार राहुल मित्र मयांकसोबत मैदानात

    कर्नाटककडून खेळणारे केएल राहुल आणि मयांक अगरवाल हे दोघेही पंजाबकडून सलामीसाठी आले आहेत. राहुलने येताच उत्तम फलंदाजी करत खेळाला चांगली सुरुवात केली आहे.

  • 21 Sep 2021 09:30 PM (IST)

    PBKS vs RR: पंजाबसमोर 186 धावांचे लक्ष्य

    उत्तम सुरुवात केल्यानंतर राजस्थानला अखेरच्या षटकात कमाल करता आली नाही. त्यामुळे ते 200 चा आकडा पार करु शकले नाहीत. पण तरी एक उत्तम आव्हान त्यांनी पंजाबसमोर ठेवले आहे. पंजाबला विजयासाठी 186 धावांची गरज आहे.

  • 21 Sep 2021 09:25 PM (IST)

    PBKS vs RR: अर्शदीपचा पंच, राजस्थान सर्वबाद

    अखेरच्या चेंडूवर अर्शदीपने कार्तिक त्यागीला त्रिफळाचीत करत राजस्थानला सर्वबाद केलं आहे. राजस्थानचा संघ 185 धावा करण्यात यशस्वी झाला आहे.

  • 21 Sep 2021 09:23 PM (IST)

    PBKS vs RR: अर्शदीपने पटकावली चौथी विकेट

    अर्शदीपने अखेरच्या षटकात चेतन साकरियाला बाद केलं आहे. या विकेट्सह त्याने सामन्यात चार विकेट्स नावावर केल्या आहेत.

  • 21 Sep 2021 09:20 PM (IST)

    PBKS vs RR: राजस्थानला आठवा झटका

    मोहम्मद शमीने आणखी एक विकेट घेतला आहे. त्याने ख्रिस मॉरीसला बाद केलं आहे. एकाच षटकात शमीला दोन विकेट्स मिळाले आहेत.

  • 21 Sep 2021 09:14 PM (IST)

    PBKS vs RR: राजस्थानचा सातवा गडी बाद

    अनुभवी मोहम्मद शमीने आणखी एक विकेट घेत राजस्थानच्या राहुल तेवतियाला त्रिफळाचीत केलं आहे. राहलु 2 धावा करुन बाद झाला आहे.

  • 21 Sep 2021 09:07 PM (IST)

    PBKS vs RR: महिपालची धाकड खेळी संपुष्टात

    खेळायला आल्यापासून षटकार आणि चौकारांची बरसात करणाऱ्या राजस्थानच्या महिपालची विकेट अर्शदीपने घेतली आहे. सीमारेषेवर मार्करमनेच त्याचा झेल घेतला आहे.

  • 21 Sep 2021 09:01 PM (IST)

    PBKS vs RR: रियान पराग आऊट!

    अनुबवी मोहम्मद शमीने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागची विकेट घेतली आहे. सीमारेषेवर असणाऱ्या  मार्करमने परागचा झेल पकडला आहे.

  • 21 Sep 2021 08:56 PM (IST)

    PBKS vs RR: महिपालने एका षटकात ठोकल्या 24 धावा

    राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू महिपाल लोमरोरने दीपक हुडाच्या ओव्हरला धमाकेदार फलंदाजी करत तब्बल 24 धावा ठोकल्या आहेत. त्याने दोन चौकार, दोन षटकार ठोकत, चार धावा धावून घेतल्या आहेत.

  • 21 Sep 2021 08:50 PM (IST)

    PBKS vs RR: अरेरे! यशस्वीचं अर्धशतकं एका धावेने हुकलं

    सुरुवातीपासून उत्तम खेळी करणारा राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवाल 49 धावांवर बाद झाला आहे. हरप्रीत ब्रारच्या चेंडूवर मयांकने त्याचा झेल पकडला आहे.

  • 21 Sep 2021 08:38 PM (IST)

    PBKS vs RR: अर्शदीपने पटकावला लियमचा महत्त्वपूर्ण विकेट

    अर्शदीपने लियम लिव्हिंगस्टोन याची विकेट घेत संघाला मोठं यश मिळवून दिलं आहे. फॅब अॅलनने उत्तम झेल घेत लियमला तंबूत परतवलं आहे.

  • 21 Sep 2021 08:26 PM (IST)

    PBKS vs RR: 10 ओव्हरनंतर राजस्थानच्या 94 धावा पूर्ण

    सामन्यात 10 ओव्हर संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सने 94 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.

  • 21 Sep 2021 08:12 PM (IST)

    PBKS vs RR: कर्णधार संजू सॅमसन बाद

    राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची विकेट इशान पोरेलने घेतली आहे. इशानच्या चेंडूवर केएल राहुलने संजूचा झेल पकडला.

  • 21 Sep 2021 07:58 PM (IST)

    PBKS vs RR: एविन लुईस आऊट!

    पंजाबचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगने पहिली विकेट घेत संघाला पहिलं यश मिळवून दिलं आहे. त्याच्या चेंडूवर मयांक अगरवालने लुईसचा झेल घेतला आहे.

  • 21 Sep 2021 07:55 PM (IST)

    PBKS vs RR: राजस्थानच्या 5 षटकांत 50 धावा

    राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि एविन लुईस यांनी चौकारांची बरसात करत 5 षटकांत 53 धावा केल्या आहेत.

  • 21 Sep 2021 07:50 PM (IST)

    PBKS vs RR: लुईसचे एका षटकात चार चौकार

    राजस्थानचा सलामीवीर एविन लुईस तुफानी खेळी करत असून इशान चौथ्या षटकात त्याने इशानला चार चौकार लगावले आहेत.

  • 21 Sep 2021 07:35 PM (IST)

    PBKS vs RR: पहिल्याच षटकात यशस्वीचे दोन चौकार

    सामन्याला सुरुवात होताच पहिल्याच षटकात युवा खेळाडू यशस्वी जैसवालने अनुभवी मोहम्मद शमीला दोन चौकार लगावले आहेत.

  • 21 Sep 2021 07:12 PM (IST)

    PBKS vs RR: राजस्थानचे महारथी

    संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जैसवाल, लियम लिविंगस्टोन, रियान पराग, राहुल तेवतिया, माहिपाल लोमरोर, ख्रिस मॉरीस, के. त्यागी, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया.

  • 21 Sep 2021 07:09 PM (IST)

    PBKS vs RR: पंजाबचे शिलेदार

    पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, निकोलस पुरन, दीपक हुडा, एफ आलेन, इशान पोरेल, हरप्रीत ब्रार, आदिल रशिद, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

  • 21 Sep 2021 07:05 PM (IST)

    PBKS vs RR: पंजाबने निवडली गोलंदाजी

    सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे. दरम्यान नुकतीच नाणेफेक झाली असून पंजाबने गोलंदाजी निवडली आहे.

  • 21 Sep 2021 07:04 PM (IST)

    IPL 2021 मध्ये आतापर्यतं

    आयपीएल 2021 च्या पहिल्या पर्वात पंजाब किंग्सने 8 पैकी 3 सामने जिंकत सातवं स्थान पटकावलं आहे. तर राजस्थान रॉयल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत सहावं स्थान पटकावलं आहे.

  • 21 Sep 2021 07:03 PM (IST)

    आज 4 नवे खेळाडू करणार पदार्पण

    आज राजस्थान आणि पंजाब अशा दोन्ही संघाकडून मिळून 4 खेळाडू आय़पीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्ससाठी एविन लुइस तर पंजाबकडून इशान पोरेल, एडेन मारक्रम आणि आदिल रशीद डेब्यू करतील.

Published On - Sep 21,2021 7:02 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.