PBKS vs SRH Live Score, IPL 2022: SRH चा सलग चौथा विजय, सात विकेट राखून मिळवला मोठा विजय
Punjab kings vs SunRisers Hyderabad Live score in marathi: पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही टीम्सनी आपले मागचे सामने जिंकलेत.
IPL 2022 पहिल्या दोन पराभवानंतर सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाबद्दल प्रश्नचिन्हा उपस्थित करण्यात आलं होतं. पण या संघाने जोरदार कमबॅक करत टीकाकारांची तोंड बंद केली. सनरायजर्स हैदराबादने रविवारी पंजाब किंग्सला (Punjab kings) नमवून सलग चौथ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव 151 धावात आटोपला. सनरायजर्स हैदराबादने अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, (Rahul Tripathi) एडन मार्कराम आणि निकोलस पूरन यांच्या झुंजार खेळाच्या बळावर विजय मिळवला. SRH ने सात विकेट आणि सात चेंडू राखून विजय मिळवला. सनरायजर्स हैदराबादचा सहा सामन्यातील चौथा आणि पंजाब किंग्सचा सहा सामन्यातील तिसरा पराभव आहे. एसआरएचचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आज भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. त्याने प्रतितास 150 किमीच्या वेगाने गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 28 धावा देत चार विकेट काढल्या.
अशी आहे पंजाब किंग्सची Playing – 11 प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह,
अशी आहे सनरायजर्स हैदराबादची Playing – 11 अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, मार्को जॅनसेन, जे.सुचित, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन
LIVE Cricket Score & Updates
-
SRH चा सलग चौथा विजय
SRH ने आज सलग चौथा विजय मिळवला. सात विकेट आणि सात चेंडू राखून पंजाब किंग्सवर विजयाची नोंद केली. एडन मार्कराम आणि निकोलस पूरनने विजयावर शिक्कामोर्तब केला.
AIDEN FINISHES OFF IN STYLE AGAIN! THE #RISERS WIN! ??? #PBKSvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 17, 2022
-
SRH च्या तीन बाद 121 धावा
16 षटकात SRH च्या तीन बाद 121 धावा झाल्या आहेत. SRH ला 24 चेंडूत विजयासाठी 31 धावांची गरज आहे. मार्कराम 22 आणि पूरन 24 धावांवर खेळतोय.
-
-
SRH ला विजयासाठी 36 चेंडूत 46 धावांची गरज
SRH ला विजयासाठी 36 चेंडूत 46 धावांची गरज आहे. 14 षटकात तीन बाद 106 धावा झाल्या आहेत.
-
एडन मार्कराम, निकोलस पूरनची जोडी मैदानात
12 षटकात हैदराबादच्या तीन बाद 88 धावा झाल्या आहेत. अभिषेक शर्माला 31 रन्सवर राहुल चाहरने शाहरुख खान करवी झेलबाद केलं. एडन मार्कराम, निकोलस पूरनची जोडी मैदानात आहे.
-
SRH ला दुसरा झटका
SRH ला दुसरा झटका. राहुल त्रिपाठीला 34 धावांवर राहुल चाहरने शाहरुख खानकरवी झेलबाद केलं. 8.2 षटकात हैदराबादच्या दोन बाद 62 धावा झाल्या आहेत
-
-
पावरप्लेमध्ये SRH च्या एक बाद 39 धावा
पावरप्लेमध्ये SRH च्या एक बाद 39 धावा झाल्या आहेत. अभिषेक शर्मा 17 आणि राहुल त्रिपाठी 19 धावांवर खेळतोय.
-
केन विलियमसन बाद
चार षटकार SRH च्या एक बाद 22 धावा झाल्या आहेत. केन विलियमसनच्या रुपाने तीन धावांवर मोठी विकेट गेली. रबाडाने त्याला धवनकरवी झेलबाद केलं. अभिषेक शर्मा-राहुल त्रिपाठी ही जोडी मैदानात आहे.
-
उमरान मलिकची भेदक गोलंदाजी
उमरान मलिकची भेदक गोलंदाजी. शेवटच्या षटकात त्याने तीन विकेट घेतल्या. ओडियन स्मिथ, राहुल चहर आणि वैभव अरोरा यांच्या विकेट काढल्या. शेवटच्या चेंडूवर अर्शदीप रनआऊट झाला. पंजाब किंग्सचा डाव 151 धावात आटोपला. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने 33 चेंडूत सर्वाधिक 60 धावा केल्या. यात पाच चौकार आणि चार षटकार होते.
-
18 षटकांचा खेळ संपला
18 ओव्हर्समध्ये पंजाब किंग्सच्या पाच बाद 142 धावा झाल्या आहेत. लिव्हिंगस्टोन 60 धावांवर नाबाद आहे.
-
पंजाब किंग्सला पाचवा धक्का, शाहरुख खान OUT
पंजाब किंग्सला पाचवा धक्का बसला आहे. सेट झालेला फलंदाज शाहरुख खान 26 धावांवर OUT झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला विलियमसनकरवी झेलबाद केलं.
-
पंजाब किंग्सच्या चार बाद 132 धावा
16 षटकात पंजाब किंग्सच्या चार बाद 132 धावा झाल्या आहेत. लिव्हिंगस्टोन-शाहरुख खान मैदानात आहे.
-
लिव्हिंगस्टोनची शानदार हाफ सेंच्युरी
15 षटकात पंजाब किंग्सच्या चार बाद 122 धावा झाल्या आहेत. लियाम लिव्हिंगस्टोनने शानदार अर्धशतक झळकवलं. त्याने चार चौकार, चार षटकार लगावले. शाहरुख खान 24 धावांवर खेळतोय.
-
लिव्हिंगस्टोन-शाहरुख खानची जोडी जमली
14 ओव्हर्समध्ये पंजाब किंग्सच्या 114 चार बाद धावा झाल्या आहेत. नेहमीप्रमाणे लियाम लिव्हिंगस्टोन दमदार फलंदाजी करत आहे. लिव्हिंगस्टोन 45 आणि शाहरुख खान 23 धावांवर खेळतोय. दोघांमध्ये 53 धावांची भागीदारी झाली आहे. नटराजनच्या या षटकात शेवटच्या चेंडूवर शाहरुख खानने सिक्स मारला.
-
पंजाब किंग्सला चौथा धक्का
पंजाब किंग्सला चौथा धक्का बसला आहे. जितेश शर्मा 11 धावांवर आऊट झाला. उमरान मलिकने त्याचा आपल्याच गोलंदाजीवर झेल घेतला. पंजाब किंग्सच्या चार बाद 61 धावा झाल्या आहेत.
-
जॉनी बेअरस्टो OUT
जॉनी बेअरस्टो 12 धावांवर आऊट झाला. सुचितने त्याला पायचीत पकडलं. 6.2 ओव्हरमध्ये पंजाब किंग्सच्या तीन बाद 48 धावा झाल्या आहेत.
-
लिव्हिंगस्टोनचा आल्या आल्या धमाका
लियाम लिव्हिंगस्टोनने खेळपट्टीवर आल्या आल्या धमाकेदार फलंदाजी सुरु केली आहे. पावरप्लेमध्ये PBKS च्या दोन बाद 48 धावा झाल्या आहेत. लिव्हिंगस्टोनने दोन चौकार, एक षटकार लगावला.
-
LBW साठी अपील पण DRS मुळे कॅच आऊट
टी.नटराजनने पाचवी ओव्हर टाकली. या षटकात प्रभसिमरनने दोन चौकार लगावले. पण पाचव्या चेंडूवर नटराजनने त्याला विकेटकिपर पूरनकरवी झेलबाद केलं. प्रभसिमरनने 11 चेंडूत 14 धावा केल्या. नटराजनने LBW साठी अपील केलं होतं. पण DRS मध्ये झेलबाद असल्याचं दिसलं. पाच षटकात पंजाब किंग्सच्या दोन बाद 33 धावा झाल्या आहेत.
-
बेअरस्टोचे चौकार
चौथी ओव्हर जॅनसेनने टाकली. पंजाब किंग्सच्या एक बाद 23 धावा झाल्या आहेत. बेअरस्टोने या ओव्हरमध्ये दोन चौकार लगावले.
-
प्रभसिमरन सिंग-जॉनी बेअरस्टोची जोडी मैदानात
तीन ओव्हर्समध्ये पंजाबच्या एक बाद 13 धावा झाल्या आहेत. प्रभसिमरन सिंग-जॉनी बेअरस्टोची जोडी मैदानात आहे.
-
शिखर धवन स्वस्तात OUT
कॅप्टन शिखर धवन स्वस्तात OUT झाला. पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखरने मार्को जॅनसेनकडे सोपा झेल दिला. शिखरने आठ धावा केल्या.
-
दोन षटकांचा खेळ पूर्ण
मार्को जॅनसेनने दुसर षटक टाकलं. पंजाब किंग्सच्या बिनबाद 8 धावा झाल्या आहेत.
-
शिखर धवन – प्रभसिमरन सिंग मैदानात
भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सच्या बिनबाद 6 धावा झाल्या आहेत. शिखर धवन – प्रभसिमरन सिंग ही सलामीची जोडी मैदानात आहे.
-
शिखर धवनचा चौकार
भुवनेश्वर कुमारच्या दुसऱ्याच चेंडूवर पुढे येऊन शिखर धवनने चौकार लगावला.
-
अशी आहे सनरायजर्स हैदराबादची Playing – 11
अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, मार्को जॅनसेन, जे.सुचित, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन
-
अशी आहे पंजाब किंग्सची Playing – 11
प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह,
-
शिखर धवन कॅप्टन
पंजाब किंग्सचा कॅप्टन मयंक अग्रवालला दुखापत झालीय. त्याच्याजागी शिखर धवनकडे कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
Published On - Apr 17,2022 3:07 PM