PBKS vs SRH Live Score, IPL 2021 : रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सचा हैदराबादवर 5 धावांनी विजय

| Updated on: Sep 26, 2021 | 10:47 AM

PBKS vs SRH Live Score in Marathi: गुणतालिकेत सातव्या स्थानावर असलेल्या पंबाज किंग्सचा मुकाबला अंतिम (8 व्या) क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी संखूप महत्त्वाचं आहे.

PBKS vs SRH Live Score, IPL 2021 : रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सचा हैदराबादवर 5 धावांनी विजय

आयपीएल 2021 च्या 37 व्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 125 धावा जमवल्या होत्या. पंजाबने दिलेलं 126 धावांचं आव्हन हैदराबादच्या फलंदाजांना पेलवेलं नाही. हैदराबादला निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या बदल्यात 120 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी हा सामना पंजाबने 5 धावांनी जिंकला. तसेच पंजाबने या स्पर्धेतील त्यांचं आव्हानदेखील जिवंत ठेवलं आहे.

126 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरुवात अत्यंत वाईट झाली. पहिल्याच षटकात अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर 2 धावांवर बाद झाल्या त्यापाठोपाठ कर्णधार केन विलियमसनदेखील एक धाव करुन बाद झाला. या सामन्यात हैदराबादकडून जेसन होल्डर आणि सलामीवीर रिद्धीमान साहा व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. हैदराबादच्या फलंदाजांची हाराकिरी या सामन्यातील त्यांच्या पराभवामागचं प्रमुख कारण ठरली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 25 Sep 2021 11:10 PM (IST)

    रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सचा हैदराबादवर 5 धावांनी विजय

    अखेरच्या षटकात विजयासाठी हैदराबादला 17 धावांची आवश्यकता होती. मात्र हैदराबदचे फलंदाज केवळ 11 धावा जमवण्यात यशस्वी ठरले, त्यामुळे अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने हैदराबादवर 5 धावांनी विजय मिळवला आहे.

  • 25 Sep 2021 10:59 PM (IST)

    हैदराबादला सातवा धक्का, राशिद खान 3 धावांवर बाद

    अर्शदीप सिंगने हैदराबादला सातवा धक्का दिला आहे. त्याने राशिद खानला 3 धावांवर असताना स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. (हैदराबाद 105/7)

  • 25 Sep 2021 10:53 PM (IST)

    पंजाबला सहावं यश, रिद्धीमान साहा 31 धावांवर बाद

    हैदराबादने सहावी विकेट गमावली आहे. सुरुवातीपासून मैदानात तळ ठोकून बसलेल्या रिद्धीमान साहाला अर्शदीप सिंगने धावचित केलं. (हैदराबाद 94/6)

  • 25 Sep 2021 10:32 PM (IST)

    हैदराबादला पाचवा झटका, अब्दूल समद बाद

    हैदराबादने पाचवी विकेट गमावली आहे. रवी बिष्णोईने अब्दूल समदला (1) ख्रिस गेलकरवी झेलबाद केलं. (हैदराबाद 60/5)

  • 25 Sep 2021 10:29 PM (IST)

    हैदराबादला चौथा धक्का, केदार जाधव 12 धावांवर बाद

    हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे. रवी बिष्णोईने केदार जाधवला 12 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (हैदराबाद 56/4)

  • 25 Sep 2021 09:31 PM (IST)

    पंजाबला मोठं यश सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 2 धावांवर बाद

    पंजाबला पहिल्याच षटकात मोठं यश मिळालं आहे. मोहम्मद शमीने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 2 धावांवर असताना यष्टीरक्षक के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं.

  • 25 Sep 2021 09:26 PM (IST)

    हैदराबादला दुसरा धक्का, कर्णधार केन विलियमसन बाद

    मोहम्मद शमीने हैदराबादला मोठा धक्का दिला आहे. शमीने हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनला त्रिफळाचित केलं (हैदराबाद 10/2)

  • 25 Sep 2021 09:15 PM (IST)

    125 धावांवर पंजाबचा डाव संपुष्टात

    निर्धारित 20 षटकात पंजाबला केवळ 125 धावांपर्यंत मजल मारला आली आहे. या बदल्यात त्यांनी 7 फलंदाज गमावले.

  • 25 Sep 2021 09:04 PM (IST)

    पंजाबचं शतक

    पंजाब किंग्सने 17 षटकात 6 गड्यांच्या बदल्यात 100 धावा धावफलकावर झळकावल्या आहेत.

  • 25 Sep 2021 08:54 PM (IST)

    पंजाबला सहावा धक्का, दीपक हुडा 13 धावांवर बाद

    पंजाबचा सहावा फलंदाज बाद झाला आहे. जेसन होल्डरने दीपक हुडाला जगदीशून सूचितकरवी झेलबाद केलं. (पंजाब 96/6)

  • 25 Sep 2021 07:58 PM (IST)

    पंजाबला दुसरा धक्का, मयंक अग्रवाल 5 धावांवर बाद

    पंजाब किंग्सने दुसरी विकेट गमावली आहे. जेसन होल्डरने मयंक अग्रवालला 5 धावांवर असताना केन विलियमसनकरवी झेलबाद केलं. (पंजाब 27/2)

  • 25 Sep 2021 07:53 PM (IST)

    पंजाबला पहिला धक्का, के. एल. राहुल 21 धावांवर बाद

    पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला आहे. जेसन होल्डरने के. एल. राहुलला (21) जगदीशन सूचितकरवी (सबस्टिट्यूट) झेलबाद केलं. (पंजाब 26/1)

  • 25 Sep 2021 07:40 PM (IST)

    पंजाबचे सलामीवीर मैदानात

    पंजाबने सलामीवीर लोकेश राहूल आणि मयंक अग्रवाल मैदानात दाखल झाले आहेत. तर हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने चेंडू संदीप शर्माकडे सोपवला आहे.

  • 25 Sep 2021 07:36 PM (IST)

    नाणेफेक जिंकत हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय

    नाणेफेक जिंकून सनरायझऱ्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Sep 25,2021 7:33 PM

Follow us
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....