जय शाह यांच्या IPL बद्दलच्या मोठ्या विधानामुळे पाकिस्तान बोर्डाला ‘आग’ लागली, जाणून घ्या PCB चं पुढचं पाऊल
BCCI चे सेक्रेटरी जय शाह यांनी IPL संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. PCB वर या विधानाचा परिणाम झाल्याचं स्पष्टपणे दिसतय.
मुंबई: BCCI चे सेक्रेटरी जय शाह यांनी IPL संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. PCB वर या विधानाचा परिणाम झाल्याचं स्पष्टपणे दिसतय. ICC च्या फ्यूचर टूर प्रोग्रॅममध्ये इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेसाठी अडीच महिन्याची स्वतंत्र तरतूद करण्यात येईल, असं जय शाह यांनी म्हटलं आहे. बीसीसीआयने या संदर्भात क्रिकेट खेळणाऱ्या अन्य देशांच्या बोर्डांसोबत आणि आयसीसी बरोबर चर्चा केली आहे, असंही जय शाह यांनी सांगितलं. बीसीसीआय सचिवांच्या या विधानानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. ते आता या विरोधात पाऊल उलचण्याचा विचार करत आहेत. ICC च्या पुढच्या FTP मध्ये IPL साठी अडीज महिन्यांचा विंडो पिरीयड असणार आहे, त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. असं झाल्यास दुसऱ्यादेशांच्या आंतरराष्ट्रीय सीरीजमध्ये अडथळा निर्माण होईल, असं पाकिस्तानचा आक्षेप आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयपीएल विरोधात आयसीसीकडे दाद मागू शकते.
क्रिकेटमध्ये पैसा येत असल्याने खुश, पण….
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, “पाकिस्तान हा मुद्दा जुलैमध्ये होणाऱ्या बैठकीत उपस्थित करेल. जुलैमध्ये ICC बोर्डाची बर्मिंघम मध्ये बैठक होणार आहे” “पाकिस्तान बोर्ड क्रिकेटमध्ये पैसा येत असल्याने खुश आहे. पण आयपीएलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना बांधण्याची बीसीसीआयची जी योजना आहे, त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होईल” असं पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
पाकिस्तान चिडण्यामागे हे सुद्धा एक कारण
पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळत नाहीत. कुठलीही फ्रेंचायजी त्यांना विकत घेत नाही, हे सुद्धा पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड चिडण्यामागच एक कारण आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलच्या फक्त पहिल्या म्हणजे 2008 च्या सीजनमध्ये खेळले होते. त्यानंतर दोन्ही देशामध्ये राजकीय संबंध बिघडले, त्याचा क्रिकेटवरही परिणाम झाला. दोन्ही देशात अनेक वर्षात द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. IPL च्या पहिल्या सीजनमध्ये शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, सलमान बट्ट, कामरान अकमल आणि सोहेल तन्वीर हे क्रिकेटपटू खेळले होते. सोहेल तन्वीरने त्या सीजनमध्ये पर्पल कॅपही जिंकली होती.