IND vs PAK : भारताकडून झालेल्या पराभवाची पाकिस्तान टीममध्ये कोण-कोण चुकवणार किंमत? संतप्त PCB ऑपरेशनच्या मूडमध्ये

India vs Pakistan T20 World Cup 2024 : पाकिस्तानला आता नुसत्या सर्जरीची नाही, मोठ्या सर्जरीची आवश्यकता आहे. PCB चे प्रमुख मोहसीन नकवी यांनी हे वक्तव्य केलय. टीम इंडियाकडून झालेल्या पराभवाने मोहसीन नकवी दु:खी आहेत. USA कडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तान टीमची छोटी सर्जरी झाली होती.

IND vs PAK : भारताकडून झालेल्या पराभवाची पाकिस्तान टीममध्ये कोण-कोण चुकवणार किंमत? संतप्त PCB ऑपरेशनच्या मूडमध्ये
IND vs PAK Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 10:05 AM

T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर पुन्हा एकदा विजय मिळवलाय. पाकिस्तानी टीम पुन्हा जिंकू शकली नाही. भारताला हरवण्याच त्यांच स्वप्न अपूर्ण राहिलं. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान आतापर्यंत 8 वेळा आमने-सामने आलेत. यात 7-1 ने भारताच पारडं जड आहे. यातून टीम इंडियाचा पाकिस्तानवर असलेला दबदबा दिसून येतो. न्यू यॉर्कमध्ये पहिल्यांदाच भारत-पाकिस्तानची टीम आमने-सामने होती. भारताचा डाव 119 धावांवर आटोपल्यावर पाकिस्तानच्या विजयाची शक्यता जास्त दिसत होती. पण बाबर आजमच्या टीमला या माफक लक्ष्याचा पाठलाग करणही जमलं नाही. भारताकडून झालेल्या या पराभवाने पाकिस्तानी फॅन्स रागात आहेत. PCB एक्शन घेण्याच्या मूडमध्ये आहे. टीमची आता मोठी सर्जरी करावी लागेल, असं PCB ने म्हटलय.

न्यू यॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी टीमने T20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा टीम इंडियाला ऑल आऊट केलं होतं. त्यांच्यासमोर फक्त 120 रन्सच टार्गेट होतं. म्हणजे विजयासाठी प्रति ओव्हर 6 धावांची गरज होती. अनेक क्रिकेटप्रेमींना पाकिस्तानचा विजय सोपा वाटत होता. पण भारतीय गोलंदाजांनी सरस कामगिरी केली. पाकिस्तानी टीमला 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून फक्त 113 धावांपर्यंत मजल मारता आली. 6 धावांनी टीम इंडियाने बाजी मारली. USA मध्ये झालेला हा पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या जिव्हारी लागला.

‘भारताकडून हरलो याच आम्हाला दु:ख’

न्यू यॉर्कच्या स्टेडियममध्ये झालेल्या या पराभवाचे परिणाम लवकरच दिसून येतील. भारताकडून पराभव झाल्यानंतर PCB ने पाकिस्तानी टीमची सर्जरी करणार असल्याच म्हटलं आहे. “भारताकडून हरलो याच आम्हाला दु:ख आहे. पाकिस्तानने ही मॅच जिंकायला हवी होती” असं PCB चे चेअरमन मोहसीन नकवी म्हणाले. टीमची सर्जरी करण्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. मोहसीन नकवी म्हणाले की, “छोट्या सर्जरीने पाकिस्तानी टीमच काम चालून जाईल. पण भारताकडून झालेल्या पराभवानंतर असं वाटतय की, पाकिस्तानी टीमला मोठ्या सर्जरीची आवश्यकता आहे”

कुठल्या प्लेयर विरोधात कारवाई होऊ शकते?

PCB चेयरमनच म्हणाले की, टीमला मोठ्या सर्जरीची गरज आहे, याचा अर्थ पाकिस्तानी टीममध्ये मोठे बदल होऊ शकतात. USA कडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी टीममध्ये थोडे बदल करण्यात आले होते. आजम खान टीममधून पत्ता कट झाला होता. पण भारताकडून झालेल्या पराभवानंतर असं वाटतय की, पाकिस्तानी टीममध्ये आणखी मोठे बदल होतील. काही खेळाडूंविरोधात PCB एक्शन घेऊ शकते. यात इफ्तिखार अहमद, उस्मान खान सारखे प्लेयर आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.