सुरुवातीच्या 2 सामन्यात का हरलो, आताच का जिंकलो, रोहित शर्माने एक एक करुन सगळं सांगितलं!

भारतीय क्रिकेट संघ आयसीसी टी-20 विश्वचषक-2021 मध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यामुळे उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले. भारताने मात्र बुधवारी रात्री अफगाणिस्तानचा ६६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत या विश्वचषकात पहिला विजय नोंदवला.

सुरुवातीच्या 2 सामन्यात का हरलो, आताच का जिंकलो, रोहित शर्माने एक एक करुन सगळं सांगितलं!
रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 10:52 AM

India vs Afganistan : भारतीय क्रिकेट संघ आयसीसी टी-20 विश्वचषक-2021 मध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यामुळे उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले. भारताने मात्र बुधवारी रात्री अफगाणिस्तानचा ६६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत या विश्वचषकात पहिला विजय नोंदवला. या सामन्यानंतर टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने मान्य केले की, पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताकडून निर्णय घेण्यात चुका झाल्या होत्या. रोहितने यामागची काही कारणं स्पष्ट केली. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचे खेळाडू सतत खेळत आहेत. त्यांनी अजिबातच आराम केलेला नाहीय. त्यामुळे 2 सामन्यांत भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं, पण आता कालच्या विजयाने भारताला लय सापडलेली आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.

भारताने अफगाणिस्ताविरोधात धमाकेदार विजय मिळविला. या विजयात रोहित शर्माचा मोठा वाटा राहिला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, “आजच्या सामन्यातील भारतीय संघाचा अॅप्रोच वेगळा राहिला. कदाचित पहिल्या दोन सामन्यांमध्ये देखील असा अॅप्रोच राहिला असता पण तसे झाले नाही. पण जेव्हा तुम्ही बराच वेळ खेळत राहता तेव्हा असे घडते. काही निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते आणि पहिल्या दोन सामन्यांमध्ये असेच घडले. विश्वचषकात खेळण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू WTC सामना, इंग्लंडचा प्रदीर्घ दौरा, आणि आयपीएल खेळून थकले होते.

मन फ्रेश असेल तर सगळं काही चांगलं होतं

जर मन फ्रेश नसेल तर निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. जेव्हा तुम्ही मैदानात जाल तेव्हा योग्य निर्णय घ्यायचाच, अशी तुमच्याकडून अपेक्षा असते. जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा तुमच्याकडून योग्य निर्णय घेणे अपेक्षित असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या फ्रेश राहाल याची काळजी घ्यावी लागेल. कदाचित त्यामुळेच आम्ही काही निर्णय घेऊ शकलो नाही. जेव्हा तुम्ही भरपूर क्रिकेट खेळता तेव्हा अशा गोष्टी घडत राहतात. तुम्हाला खेळण्यापासून जरा ब्रेकही हवा असतो.”

फॉर्मबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला?

पहिल्या दोन सामन्यात रोहितची बॅट बोलली नाही. पाकिस्तान आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. रोहित म्हणाला, “पहिल्या दोन सामन्यांत चांगली कामगिरी झाली नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही एका रात्रीत वाईट खेळाडू बनलो. जर तुमचा दोन सामन्यांत पराभव झाला तर संघ वाईट ठरत नाही. सर्व खेळाडू वाईट आहेत, संघ चालवणारे लोक वाईट आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला न घाबरता खेळावे लागेल अगदी परिणामांची चिंता न करता…!”

(playing lot of cricket reason for some bad decision in first two matches of t20 world cup 2021 says Rohit sharma)

हे ही वाचा :

अश्विनची ‘तारीख पे तारीख’, 52 वी टी ट्वेन्टी विकेट घेण्यासाठी जवळपास 4 वर्ष, वाट पाहता पाहता धोनी मेन्टॉर बनला!

T20 World Cup : अफगाणिस्तानविरोधात दणदणीत विजय, रोहित राहुलने 13 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला

India vs Afghanistan T20 world cup Result: टीम इंडियाकडून देशवासियांना Happy Diwali, दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.