Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS World Cup 2023 Final | फायनल मॅचला स्वत: मोदी राहणार हजर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान येणार?

IND vs AUS World Cup 2023 Final | फायनल मॅचला मोदींसोबत मंत्रिमंडळातले अजून कुठले सदस्य हजर असणार?. वर्ल्ड कप 2023 ची फायनल मॅच पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

IND vs AUS World Cup 2023 Final | फायनल मॅचला स्वत: मोदी राहणार हजर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान येणार?
pm narendra modi and amit shah will go to ahmedabad to watch odi icc world cup 2023 final india vs australia
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 10:00 AM

IND vs AUS World Cup 2023 Final | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ICC वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना होणार आहे. हा रोमांचक सामना पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजर असतील. इतकच नाही, या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. निमंत्रण स्वीकारुन ते सुद्धा फायनल पाहण्यासाठी येतील, अशी अपेक्षा आहे. अजूनपर्यंत दोघांकडून कंफर्मेशन आलेलं नाहीय. ऑस्ट्रेलियन टीम आठव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेच टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा तर टीम इंडियाने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकलाय.

दोन दिवसांपूर्वीच टीम इंडियाने न्यूझीलंडला 70 धावांनी हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 397 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड टीमने 327 धावा केल्या. या मॅचमध्ये भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने जलवा दाखवला. त्याने 9.5 ओव्हर्समध्ये 57 धावा देऊन 7 विकेट काढल्या.

ऑस्ट्रेलियाला शर्थ करावी लागली

दुसरा सेमीफायनल सामना ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळला गेला. गुरुवारी कोलकाताच्या इडन गार्डन्सवर ही मॅच झाली. दक्षिण आफ्रिकेने पहिली बॅटिंग केली. त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 213 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 47.2 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला शर्थ करावी लागली. कारण दक्षिण आफ्रिकेने 174 धावांवर त्यांचे 6 विकेट काढले होते. पण कसाबसा ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. आता फायनलमध्ये त्यांच्यासमोर टीम इंडियाच आव्हान आहे.

धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.