IND vs ENG | कसोटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी टीम इंडियातील ‘या’ खेळाडूला दिल्या खास शुभेच्छा
IND vs ENG | पंतप्रधान नरेंद्र मोदींच क्रीडा क्षेत्रावरही बारीक लक्ष असतं. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंच ते नेहमीच कौतुक करतात. त्यांना प्रोत्साहन देतात. परदेशात एखाद्या खेळाडूने देशाच नाव उंचावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेच त्या खेळाडूशी फोनवरुन संपर्क साधतात.
IND vs ENG | देशाचा कारभार चालवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच क्रीडा क्षेत्रावरही बारीक लक्ष असतं. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंच ते नेहमीच कौतुक करतात. त्यांना प्रोत्साहन देतात. परदेशात एखाद्या खेळाडूने देशाच नाव उंचावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेच त्या खेळाडूशी फोनवरुन संपर्क साधतात. त्याच कौतुक करतात. ऑलिम्पिकमध्ये हे अनेकदा दिसून आलय. मागच्यावर्षी वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला होता. आता त्यांनी टीम इंडियातील एका खेळाडूच कौतुक केलय. महत्त्वाच म्हणजे हा खेळाडू सुद्धा कौतुकाला तितकाच पात्र आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्याच्या कामगिरीची दखल घेतलीय.
भारत-इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु असताना राजकोटमध्ये इतिहास रचला गेला. सीनियर स्पिनर रविचंद्रन अश्विनने 500 विकेट पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. रविचंद्रन अश्विनने करीअरमध्ये हा जो टप्पा गाठलाय, त्यावर समाधान व्यक्त केलय. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 619 विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. या राष्ट्रीय रेकॉर्डचा पाठलाग करण्यात अश्विनला अजिबात रस नाहीय. अश्विनने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्यादिवशी 500 विकेट पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने मीडियाशी संवाद साधला.
Congratulations to Ravichandran Ashwin on the extraordinary milestone of taking 500 Test wickets! His journey and accomplishments are testament to his skill and perseverance. My best wishes to him as he scales further peaks. @ashwinravi99
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2024
पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा संदेशात काय म्हटलय?
कुंबळेच्या रेकॉर्डबद्दल अश्विनला विचारलं तेव्हा तो म्हणाला की, “याच सरळ उत्तर नाहीय. हा रेकॉर्ड 120 विकेट दूर आहे. मला प्रत्येक दिवस जगायच आहे. मी 37 वर्षांचा आहे. पुढे काय होणार हे मला माहित नाही” “करीअरमध्ये 500 विकेट घेऊन, हा जो असामान्य महत्त्वाचा टप्पा गाठलाय, त्याबद्दल अश्विन तुला शुभेच्छा. अश्विनचा हा जो प्रवास आहे, कर्तुत्व आहे, त्यातून त्याचं कौशल्य आणि चिकाटीची साक्ष मिळते. माझ्या मनापासून अश्विनला शुभेच्छा, त्याने करीअरमध्ये अजून उंची गाठावी” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.