Mohammad Siraj Celebration: सिराजचं आफ्रिकेत रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन, प्रीमियर लीगची सॉलिड रिअॅक्शन
दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथे खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात भारताने 327 धावा केल्या, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला.
Mohammad Siraj Celebration: दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथे खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात भारताने 327 धावा केल्या, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर आफ्रिकेचे फलंदाज निष्प्रभ ठरले. दरम्यान, जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजचे सेलिब्रेशनही कालपासून चर्चेत आहे. (Premier League reacts to Mohammed Siraj followed Cristiano Ronaldo’s SIIIUUUU celebration)
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात एक विकेट घेतली, त्याने Rassie van der Dussen ला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले. मात्र यानंतर मोहम्मद सिराजने ज्या प्रकारे त्याचा आनंद साजरा केला तो क्षण पाहण्यासारखा होता.
मोहम्मद सिराजने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणेच सेलिब्रेशन केलं. रोनाल्डोची ‘SIIIUUUU’ सेलिब्रेशन स्टाईल जगभर प्रसिद्ध आहे, गोल मारल्यानंतर तो या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करतो. मोहम्मद सिराजनेही विकेट मिळाल्यानंतर तशाच पद्धतीने सेलिब्रेशन केलं.
सिराजच्या या SIIIUUUU सेलिब्रेशनवर प्रीमियर लीगमधूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. इंग्लिश प्रीमियर लीग भारतातही खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे मोहम्मद सिराजचं हे सेलिब्रेशन लीगच्या इंडियन ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलं आहे. प्रीमियर लीगने लिहिले आहे की, SIIIUUUU सेलिब्रेशन दक्षिण आफ्रिकेतील भारताच्या कॅम्पमध्ये पोहोचले आहे.
#MohammedSiraj ???????? Style Celebration ख्रिस्तियानो रोनाल्डोची ‘SIIIUUUU’ सेलिब्रेशन स्टाईल जगभर प्रसिद्ध आहे, गोल मारल्यानंतर तो असं सेलिब्रेशन करतो. मोहम्मद सिराजनेही विकेट मिळाल्यानंतर तशाच पद्धतीने सेलिब्रेशन केलं. @kreedajagat #INDvsSA #Ronaldo #SIIIUUUU pic.twitter.com/SjjnCgq1pB
— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) December 29, 2021
दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 327 धावा केल्या होत्या. केएल राहुलने भारतासाठी शानदार शतक झळकावले, त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ 197 धावांत गुंडाळले. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने पाच बळी घेतले, तर बुमराह-शार्दुलने प्रत्येकी दोन आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.
The ???????? celebration has reached the @BCCI camp in South Africa ? pic.twitter.com/VLELTNhPbM
— Premier League India (@PLforIndia) December 28, 2021
इतर बातम्या
IND VS SA: ऋषभ पंतची कमाल, धोनीचा विक्रम मोडला
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने एक चूक सुधारली आणि टीम इंडियाचे फलंदाज झाले फेल
IND vs SA: रोहितच्या अनुपस्थितीत, विराट असूनही ‘या’ खेळाडूकडे दिली जाऊ शकते वनडेची कॅप्टनशिप
(Premier League reacts to Mohammed Siraj followed Cristiano Ronaldo’s SIIIUUUU celebration)