IPL 2022 गाजवणाऱ्या दोन युवा खेळाडूंची मुंबईच्या संघात निवड, रणजीसाठी टीम जाहीर
रणजी करंडक स्पर्धेत क्वार्टर फायनलचे सामना 6 जूनपासून बँगलोरमध्ये सुरु होणार आहेत. मुंबईला उत्तराखंड विरुद्ध सामना खेळायचा आहे.
मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेत प्लेऑफमध्ये दाखल होण्याची Delhi capitals ची संधी Mumbai indians मुळे हुकली. मुंबईने पराभूत केल्यामुळे दिल्लीचं लीग फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. दिल्लीकडून सध्या चालू असलेल्या आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ ने दमदार प्रदर्शन केलं. पण तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळाली नाही. अनेकांना पृथ्वी शॉ ची निवड न झाल्याचं आश्चर्य आहे. IPL 2022 बद्दल बोलायचं झाल्यास, पृथ्वी शॉ ने 10 सामन्यात 283 धावा केल्यात. त्याची फलंदाजीची सरासरी 30 आहे. आयपीएलच्या लीग स्टेजमधल्या शेवटच्या काही सामन्यांआधी त्याला टायफाइडची बाधा झाली. त्यामुळे त्याला खेळता आलं नाही. आयपीएलमध्ये पृथ्वीची कामगिरी समाधानकारक असून त्याच्याहाती आता मुंबईच्या रणजी संघाची कमान सोपवण्यात आलीय.
क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचा सामना कुठल्या संघाविरुद्ध?
रणजी करंडक स्पर्धेत क्वार्टर फायनलचे सामना 6 जूनपासून बँगलोरमध्ये सुरु होणार आहेत. मुंबईला उत्तराखंड विरुद्ध सामना खेळायचा आहे. सोमवारी रात्री मुंबईच्या रणजी संघाची घोषणा करण्यात आली. 21 सदस्यीय संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ कडे सोपवण्यात आलय.
यशस्वी जैस्वालला संधी
श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता. शिवम दुबे, अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादवची दुखापतीमुळे निवड झालेली नाही. सर्फराझ खान, यशस्वी जैस्वालला निवडकर्त्यांनी संधी दिली आहे. धवल कुलकर्णी, तृषार देशपांडे आणि शम्स मुलानी या अनुभवी गोलंदाजांचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.
कोणी किती धावा केल्या?
ग्रुप स्टेजमध्ये मुंबईने 3 पैकी 2 सामने जिंकले. एका मॅच ड्रॉ झाली. सर्फराझने 137 पेक्षा जास्त सरासरीने 551 धावा केल्या. रणजीत पृथ्वी शॉ ने 26.75 च्या सरासरीने 107 धावाच केल्या आहेत.
मुंबईची रणजी टीम –
पृथ्वी शॉ (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, भूपेन लालवाणी, अरमान जाफर, सर्फराझ खान, सुवेद पार्कर, आकर्षित गोमेल, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, अमन खान, साइराज पाटिल, शम्स मुलानी, ध्रुमिल मातकर, तनुष कोटियां, शशांक अटार्डे, धवल कुलकर्णी, तृषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन दियास, सिद्धार्थ राऊत आणि मुशीर खान,