DC vs RR IPL 2022: दिल्लीला मोठा झटका, हॉस्पिटलमध्य असलेला Prithvi Shaw IPL 2022 स्पर्धेतून बाहेर
DC vs RR IPL 2022: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना सुरु आहे. IPL 2022 स्पर्धेतला हा 58 वा सामना आहे.
मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (DC vs RR) सामना सुरु आहे. IPL 2022 स्पर्धेतला हा 58 वा सामना आहे. सामन्यादरम्यान दिल्ली संघाला झटका देणारी एक मोठी बातमी आहे. आजच्या सामन्यातही दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi shaw) खेळत नाहीय. सीएसके विरुद्धच्या लढतीतही पृथ्वी शॉ खेळला नव्हता. त्याला तापामुळे रुग्णालयात दाखल कराव लागलं होतं. पृथ्वी शॉ आता उर्वरित संपूर्ण सीजन खेळणार नाहीय. दिल्ली कॅपिटल्सचे हेड कोच रिकी पॉन्टिंग (Ricky ponting) यांच्याा हवाल्याने स्पोर्ट्स टायगर वेबसाइटने हे वृत्त दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी पृथ्वी रुग्णालयातील बेडवरुन त्याचा फोटो शेअर केला होता. पृथ्वीच्या अनुपस्थितीत श्रीकांत भरत डेविड वॉर्नर सोबत सलामीला येणार आहे.
CSK विरुद्धच्या सामन्याआधी पृथ्वी रुग्णालयात
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल-2022 सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला होता. संघाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पृथ्वीने स्वतःचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोमध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला दिसत आहे. पृथ्वी शॉला खूप ताप होता, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. पृथ्वीनं एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेला आहे. त्याच्या समोरच्या टेबलावर लॅपटॉपही ठेवला आहे. पृथ्वीने लिहिले की, ‘मी रुग्णालयात दाखल आहे आणि सध्या तापातून बरा आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी लवकरच मैदानात परतेन. पृथ्वीने आयपीएलच्या चालू मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले असून 2 अर्धशतकांच्या मदतीने त्याने एकूण 259 धावा केल्या आहेत.
दिल्लीला विजयासाठी 161 धावांच लक्ष्य
आजच्या सामन्यात दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सहाबाद 160 धावा केल्यात. राजस्थान रॉयल्सने 11 सामन्यात सात विजय मिळवले असून त्यांचे 14 पॉइंटस झाले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत. आजचा सामना जिंकल्यास, ते लखनौशी बरोबरी करतील. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकतील. दिल्लीचा संघ हा सामना जिंकल्यास ते टॉप चारच्या बाहेरच राहतील. पण प्लेऑफमध्ये दाखल होण्याचं त्यांच आव्हान टिकून राहील. त्यामुळे दिल्लीच्या टीमला आज विजय आवश्यक आहे.