लास्ट ओव्हरचा थरार, 22 धावांची गरज, 9 बॉलची ओव्हर, पहिल्या बॉलवर 7 रन्स, मात्र तरीही हरली चेस करणारी टीम
या सामन्यात क्रिकेटचा सर्वोच्च रोमांच पहायला मिळाला. लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज होती. खासकरुन T20 क्रिकेट सुरु झाल्यापासून अनेक सामने अटी-तटीचे झाले आहेत.
लाहोर : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा रोमांचक सामने पहायला मिळतात. खासकरुन T20 क्रिकेट सुरु झाल्यापासून अनेक सामने अटी-तटीचे झाले आहेत. तुम्ही एक विचार करत असता आणि निकाल दुसराच लागतो. पाकिस्तान सुपर लीगमध्ये काल मुल्तान सुल्तांस विरुद्ध कराची किंग्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये मुल्तानची टीम जिंकली. या सामन्यात क्रिकेटचा सर्वोच्च रोमांच पहायला मिळाला. लास्ट ओव्हरमध्ये कराची किंग्सला विजयासाठी 22 धावांची गरज होती.
क्रिकेटमध्ये 6 चेंडूंची एक ओव्हर असते. पण मुल्तानचा गोलंदाज अब्बास आफ्रिदीने 9 चेंडूंची ओव्हर टाकली. महत्त्वाच म्हणजे इतकी मोठी ओव्हर होऊनही कराची किंग्सला सामना जिंकता आला नाही. त्याच्या हातात 6 विकेट होत्या.
लास्ट ओव्हरमधील रोमांच
PSL च्या लास्ट ओव्हरमधील रोमांच विस्ताराने जाणून घ्या. अब्बास आफ्रिदीने पहिला चेंडू नो बॉल टाकला. त्यावर स्ट्राइकवर उभ्या असलेल्या इमाद वसीमने षटकार ठोकला. म्हणजे आता कराची किंग्सला 6 चेंडूत 22 ऐवजी 6 चेंडूत 15 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर अब्बासच्या चेंडूवर इमादने एक धाव घेतली. बेन कटिंग स्ट्राइकवर आला. आता 5 चेंडूत 14 धावांची आवश्यकता होती.
दुसरा बॉल पुन्हा वाइड
अब्बास आफ्रिदीने दुसरा वाइ़ड चेंडू टाकला. आता 5 चेंडूत विजयासाठी 13 धावांची गरज होती. सामन्यात रोमांच खूप वाढला. त्यानंतर अब्बासच्या दुसऱ्या चेंडूवर सिक्स मारला. आता कराची किंग्सला विजयासाठी 4 चेंडूत 7 धावा हव्या होत्या. त्यांच्या हातात 6 विकेट होत्या.
विजयासाठी 3 चेंडूत 6 धावांची गरज
मुल्तान सुल्तांसचा गोलंदाज अब्बास आफ्रिदीने पुन्हा वाइड चेंडू टाकला. कराचीला आता विजयासाठी 3 चेंडूत 6 धावांची गरज होती. काराचीसाठी विजय सोपा वाटत होता. बेन कटिंग स्ट्राइकवर होता. पण तरीही मुल्तानचा गोलंदाज अब्बास आफ्रिदीने असं होऊ दिलं नाही.
अशी जिंकली मॅच?
त्याने तिसऱ्या बॉलवर एकही धाव दिली नाही. चौथ्या बॉलवर बेन कटिंगचा विकेट घेतला. 5 व्या चेंडूवर पुन्हा एक रन्स काढला. ओव्हरच्या लास्ट बॉलवर कराची किंग्सला 5 धावांची आवश्यकता होती. पण अब्बास आफ्रिकीदने फक्त 1 रन्स दिला. अशा प्रकारे मुल्तान सुल्तांसने ही मॅच जिंकली. 1 ओव्हरमध्ये 9 चेंडू पण तरीही 22 रन्स डिफेंड अब्बास आफ्रिदीने 9 चेंडूंची लास्ट ओव्हर टाकली. यात 2 वाइड आणि एक नो बॉल होता. कराची किंग्सकडे पूर्ण संधी होती. पण मुल्तान सुल्तांसच्या टीमने हरलेली मॅच 3 रन्सने जिंकण्यात यश मिळवलं.