DC vs KKR: दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याला वादाचे गालबोट, सामना सुरु असतानाच मॉर्गनच्या अंगावर आला आश्विन, पाहा VIDEO
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात केकेआरने दिल्लीवर तीन गडी राखून विजय मिळवला आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्याला वादाचे गालबोटही लागले.
IPL 2021: क्रिकेट जगतातील सर्वाक मनोरंजनात्मक क्रिकेट लीग असणाऱ्या आय़पीएलमध्ये (IPL 2021) दररोज काहीतरी नवीन घडत असते. कधी धमाकेदार फलंदाजी, तर कधी गोलंदाजी किंवा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पण आज मात्र दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात मैदानावर वाद पाहायला मिळाला. जेन्टनमन्स गेम म्हटलं जाणाऱ्या क्रिकेटमध्ये अनेकादा स्लेजिंग सारख्या घटना घडतात. त्यात मैदानावरच खेळाडूंमध्ये वाद झाल्याचंही अनेकदा पाहायला मिळतं. आजही त्याच्याच प्रत्यय आला. दिल्लीचा गोलंदाज आर आश्विन (R Aswhin) आणि केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) यांच्यात मैदानातच वाद झाल्याच (Ashwin Fight with morgan) पाहायला मिळालं.ट
दिल्ली आणि केकेआर यांच्यातील सामन्यात केकेआरने दिल्लीवर तीन गडी राखून विजय मिळवला. अवघ्या 128 धावांचा पाठलाग करतानाही केकेआर संघाची अवस्था दिल्लीच्या गोलंदाजानी खराब केली. त्यामुळे सामना 19 व्या षटकापर्यंत तर गेलाच सोबतच केकेआर केवळ 3 विकेट्सच्या फरकाने जिंकली. त्यामुळे या चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळांडूनी उत्तम खेळ दाखवला. पण या खेळासोबतच चुरस अधिक झाल्यामुळे थोडे खटकेही उडाले.
काय झालं आश्विन आणि मॉर्गनमध्ये?
सध्या आश्विन आणि मॉर्गन यांच्यात वादाचा व्हायरल होणारा व्हिडीओमधील आश्विनचा वाद हा मूळात केकेआरच्या टीम साऊदी याच्याशी होता. पण त्यावादात मॉर्गन पडल्याने आश्विनचा आणि त्याचाही वाद झाला. तर ही घटना दिल्ली कॅपिटल्स फलंदाजी करताना अखेरच्या षटकात घडली. हे षटक टीम साऊदी टाकत असताना त्याने आश्विनची विकेट घेतली. त्यावेळी तो काहीतरी पुटपुटला. त्यावर उत्तर देत आश्विनने वाद घातला. दरम्यान यामध्ये केकेआरचा कर्णधार मॉर्गन पडला. त्यावेळी आश्विन त्याला प्रतित्त्यूर देताना अंगावर गेला. दरम्यान दोघांच्या भांडणात दिनेश कार्तिकने भाग घेत अश्विनला शांत करत पॅवेलियनमध्ये पाठवले. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nicepic.twitter.com/CQrOhdv8cG
— Aryan (@Kohlis_shadow) September 28, 2021
केकेआरचा 3 विकेट्सनी विजय
दिल्लीने दिलेले 128 धावांचे सोपे आव्हान केकेआरच्या संघाचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांच्यासाठी फारच सोपे होते. पण दिल्लीच्या गोलंदाजानी केलेल्या भेदक माऱ्यासमोर केकेआरचे बहुंताश फलंदाज गारद झाले. सलामीवीर शुभमनने केवळ 30 धावा करत चांगली सुरुवात करुन दिली आणि मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या नारायणने 10 चेंडूत 21 धावांची तुफान खेळी केली. तर सुरुवातीपासून टिकून राहिलेल्या नितीश राणाने नाबाद 36 धावा केल्या. ज्यामुळे केकेआरने अखेर विजय मिळवला. दिल्लीकडून आवेश खानने 3, तर रबाडा, नॉर्खिया, आश्विन आणि यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.
हे ही वाचा
IPL 2021: दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय
(R Ashwin Fight with eoin morgan in DC vs KKR match video goes viral)