IND vs ENG: राधाच्या कॅचने इंग्लंडच्या विजयात आणली बाधा, VIDEO पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त

IND vs ENG: क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. भारत-इंग्लंडमधील महिला क्रिकेट सामन्यात अशाच एका कॅचने कमाल केली. डर्बीमध्ये हा सामना खेळला गेला.

IND vs ENG: राधाच्या कॅचने इंग्लंडच्या विजयात आणली बाधा, VIDEO पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त
radha yadavImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 12:07 PM

मुंबई: क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. भारत-इंग्लंडमधील महिला क्रिकेट सामन्यात अशाच एका कॅचने कमाल केली. डर्बीमध्ये हा सामना खेळला गेला. भारताची महिला क्रिकेटपटू राधाची एक कॅच इंग्लंडच्या विजयाच्या मार्गात बाधा बनली. तुम्ही म्हणाल, भले एका कॅचमुळे सामना कसा काय जिंकता येईल?. पण ती कॅचच तशी होती. राधा यादवने ती कॅच ज्या पद्धतीने पकडली, त्यामुळे टीममध्ये एक जोश निर्माण झाला.

राधाच्या कॅचमुळे इंग्लंडच्या मार्गात बाधा

मॅचमध्ये टीम इंडियाच पारडं आधीपासूनच जड होतं. पण या कॅचमुळे त्यात आणखी भर पडली. टॉस जिंकून इंग्लंडच्या महिला टीमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टी 20 मध्ये भारताला हरवलं, तशीच दुसरी मॅच जिंकू असा त्यांचा इरादा होता.

महिला खेळाडूंची जबरदस्त गोलंदाजी

इंग्लंडच्या टॉप ऑर्डरचे पहिले चार फलंदाज 50 धावात डगआऊटमध्ये परतले. भारतीय महिला गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. या सगळ्यात राधा यादवची एका जबरदस्त कॅचही होती. ज्यामुळे टीममध्ये जोश निर्माण झाला.

धावली, डाइव्ह मारल्यानंतर कॅच

राधा यादवच्या कॅचवर इंग्लंडचा चौथा फलंदाज तंबूत परतला. ही कॅच पकडणं सोपं नव्हतं. हा कमालीचा झेल होता. ही कॅच पकडण्यासाठी काही अंतरापर्यंत तिला धावाव लागलं. धावूनही काम पूर्ण झालं नाही. राधा यादवला कॅच पकडण्यासाठी अखेर डाइव्ह मारावी लागली. तिच्या या कॅचवर इंग्लंडची ब्रायोनी स्मिथ 16 धावांवर बाद झाली.

स्मृती मांधनाची जबरदस्त बॅटिंग

इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने स्मृती मांधनाच्या जबरदस्त इनिंगच्या बळावर 17 व्या ओव्हरमध्येच हे लक्ष्य गाठलं. स्मृतीने नाबाद 79 धावा फटकावल्या. 20 चेंडू बाकी राखून टीम इंडियाने हा सामना जिंकला. कॅप्टन हरमनप्रीत कौर 29 धावांवर नाबाद राहिली.

मालिका बरोबरीत

स्मृती मांधनाने 53 चेंडूत या धावा फटकावल्या. त्यासाठी तिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. टीम इंडियाने 8 विकेटने हा सामना जिंकला. 3 T20I सामन्यांच्या सीरीजमध्ये मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.