पाकिस्तानविरुद्ध कोण कोण खेळणार? कोण बाहेर जाणार? टीम इंडियाची ऑस्ट्रेलियन ‘टेस्ट’ सुरु !

भारत सध्या सराव सामन्यात व्यस्त असला तरी सर्वाधिक चिंता ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची आहे. विश्वचषकातील पहिला सामना असण्यासोबतच पाकिस्तान विरुद्धचा सामना म्हणजे काही औरच! त्यामुळे यावेळी दमदार लयीत असणारे खेळाडू घेणे भारताला आवश्यक आहे.

पाकिस्तानविरुद्ध कोण कोण खेळणार? कोण बाहेर जाणार? टीम इंडियाची ऑस्ट्रेलियन 'टेस्ट' सुरु !
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 5:06 PM

दुबई:  बहुचर्चित अशा टी-20 विश्वचषकासाला (T20 World Cup) अखेर सुरुवात झाली आहे.  ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार सुरु असताना भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्याआधी सुपर 12 मधील संघ सराव सामने खेळत आहेत. भारताने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडला मात दिल्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. दरम्यान हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असून यातूनच आगामी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठीता संघ भारतीय संघ व्यवस्थापन निवडणार आहे.

भारताचा विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानशी (India vs Pakistan) 24 ऑक्टोबर रोजी आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत सराव सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजला 7 विकेट्सने पराभूत केलं आहे. वेस्ट इंडिजसारख्या तगड्या संघाला पराभूत करणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध भारताला चांगली रणनीती करुन उत्तम खेळाडू निवडणंही महत्त्वाचं आहे. सध्या संघातील खेळाडूंचा विचार करता बहुतांश खेळाडू चांगली कामगिरी करत असले तरी दोन गोलंदाज मात्र खास कामगिरी करताना दिसत नाहीत.

भुवनेश्वर आणि राहुलवर टांगती तलवार

भारतीची गोलंदाजी ही पूर्वीपासून एक समस्या आहे. अलीकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज संघात असले तरी नेमका कोणता खेळाडू कधी फॉर्ममध्ये आहे? असे प्रश्न आहेतच. त्यात सध्या टी20 संघात स्थान देण्यात आलेले गोलंदाज राहुल चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे खास लयीत दिसत नाहीत. अनुभवी भुवीला स्वींग जमत नसून त्याने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात बऱ्याच धावा खालल्या. 4 षटकात 54 धावा देत त्याने एकही विकेट घेतला नाही. तर दुसरीकडे युझवेंद्र चहलच्या जागी संघात आलेल्या राहुल चाहरनेही 4 षटकात 43 धावा देत केवळ एकच विकेट घेतली. त्यामुळे या दोघांना संघात कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करणं अनिवार्य आहे.

सलामीवीराचं गणितही अवघड

सध्या भारतीय संघाचा विचार करता त्यामध्ये गोलंदाजीमध्ये सतत बदल सुरु असतात. फिरकीपटू अधिक की वेगवान गोलंदाज अधिक? हे बदल होतच असतात. पण फलंदाजीमध्ये सहसा बदल होत नाहीत. पण टी20 विश्वचषकात संघात काही मोठे बदल झाले. ज्यात अनुभवी सलामीवीर शिखर धवनला विश्रांती देण्यात आल्याने सलामीला रोहित शर्माच्या सोबत केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. तसंच अधिकचा पर्याय म्हणून इशानलाही अंतिम 15 मध्ये घेण्यात आलं आहे. पण आका इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात रोहित नसताना इशानने केेलेली जबरदस्त खेळी संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवत आहे. कारण इशानला संघात घेण्यासाठी सलामीवीर राहुलला विश्रांती द्यावी लागेल. पण राहुलनेही या सामन्यात 51 धावा ठोकल्या. त्यामुळे नेमकी संघ बांधणी कशी करणार? हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे.

इतर बातम्या

ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा

T20 World Cup: ‘हार्दिकच्या हाती बॅट असो वा बॉल, तो सहज मॅच पलटू शकतो’; दिग्गज खेळाडूची स्तुतीसुमने

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

(Rahul chahar and bhuvi are in danger to go out of team they need to prove in warm up matches)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.