IND vs ENG: लज्जास्पद पराभवानंतर राहुल द्रविड यांचं वादग्रस्त वक्तव्य

IND vs ENG: राहुल द्रविड यांनी BCCI वर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह.

IND vs ENG: लज्जास्पद पराभवानंतर राहुल द्रविड यांचं वादग्रस्त वक्तव्य
rahul-DravidImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 6:13 PM

एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 169 धावांच लक्ष्य दिलं होतं. इंग्लंडने एकही विकेट न गमावता हे टार्गेट पूर्ण केलं. 4 ओव्हरआधीच इंग्लंडला विजय मिळवून दिला. इतक्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाच नाही, कोट्यवधी क्रिकेट चाहते निराश झालेत.

या पराभवानंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान केलय. बीसीसीआयच्या विचारसरणीवर प्रश्न निर्माण केलाय.

राहुल द्रविड काय म्हणाले?

“परदेशी लीगमध्ये खेळल्याने आमच्या खेळाडूंचा फायदा होईल. हे बीसीसीआयवर आहे. निर्णय त्यांना घ्यायचा आहे” असं विधान हेड कोच द्रविड यांनी केलं. बीसीसीआय आपल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळू देत नाही. भारतीय क्रिकेटशी संबंधित कुठलाही खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही. दुसऱ्याबाजूला इंग्लंडचे खेळाडू जगभरातील लीग क्रिकेटमध्ये खेळत असतात.

खेळाडूंना काय फायदा होतो?

भारताविरुद्ध कमालीची फलंदाजी करणारे जोस बटलर आणि एलेक्स हेल्स जगभरातील लीग्समध्ये खेळत असतात. हेल्स आयपीएलशिवाय कॅरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग आणि ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्येही खेळतो. बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा फायदा एलेक्स हेल्सला झाला.

या खेळाडूने टी 20 वर्ल्ड कपमध्ये कमालीच प्रदर्शन केलय. विदेशी लीगमध्ये खेळल्याने तुम्हाला त्या देशाच्या कंडीशन्स आणि खेळपट्टीचा अनुभव मिळतो. आयसीसी टुर्नामेंटसमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो.

10 विकेटने झालेल्या पराभवावर हेड कोच काय म्हणाले?

टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव झाला. राहुल द्रविड या पराभवामुळे हैराण दिसले नाहीत. अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घड़त असतात, असं ते म्हणाले. या पराभवामुळे मी निराश आहे, असही त्यांनी सांगितलं. टीम इंडिया एकमेव टीम आहे, सलग दोन टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचा 10 विकेटने पराभव झालाय. पाकिस्तानने 2021 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.