मोठी बातमी : राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य कोच नियुक्त, पारस म्हांब्रे बॉलिंग कोच, नेमकी कितीची झाली डिल?
आयपीएलचा सिजन संपलाय आणि टीम इंडियासंबंधी एक मोठी बातमी हाती आलीय. द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि बॅटींगचा धुरंधर राहुल द्रविड (Rahul Dravid) हा आता टीम इंडियाचा मुख्य कोच असेल. BCCI नेच राहुल द्रविडच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय.
मुंबई : आयपीएलचा सिजन संपलाय आणि टीम इंडियासंबंधी एक मोठी बातमी हाती आलीय. द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि बॅटींगचा धुरंधर राहुल द्रविड (Rahul Dravid) हा आता टीम इंडियाचा मुख्य कोच असेल. BCCI नेच राहुल द्रविडच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय. द्रविडचा कोच म्हणून दोन वर्षांचा कालावधी असेल म्हणजेच 2023 पर्यंत टीम इंडियाची जबाबदारी राहुल द्रविडकडे असेल. काल IPL फायनल खेळली गेली, त्याच दरम्यान द्रविडनं मुख्य कोचची जबाबदारी स्वीकारल्याचं वृत्त आहे. काही दिवसात T20 वर्ल्ड कप पार पडतोय, त्यानंतर द्रविड टीमची कमान स्वत:च्या हाती घेईल. म्हणजेच न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे, तेच द्रविडचं कोच म्हणून पहिलं मिशन असेल.
दुबईत बीसीसीआयचे पदाधिकारी असलेले सौरव गांगुली आणि जय शाह यांची राहुल द्रविडसोबत बैठक झाली. त्याच बैठकीत राहुल द्रविडला कोच होण्यासाठी दोघांनी गळ घातली आणि त्याला राहुलनं संमती दिली. ही सर्व माहिती BCCI च्या एका टॉपच्या अधिकाऱ्यानं TOI ला दिली. त्यात तो म्हणतो, राहुल द्रविड हे टीम इंडियाचे पुढचे मुख्य कोच असतील. ते लवकरच NCA चा राजीनामाही देतील. विशेष म्हणजे ह्या सर्व घडामोडींची अधिकृत माहिती बीसीसीआयनं दिलेली नाही.
द्रविड हेड कोच, म्हांब्रे बॉलिंग कोच
बीसीसीआयनं फक्त मुख्य कोचचाच निर्णय घेतलाय असं नाही तर बॉलिंग कोचचीही निवड केलीय. पारस म्हांब्रेला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त करण्यात आलंय. पारस हा राहुल द्रविडचाच विश्वासू मानला जातो. सध्या विक्रम राठोड हे बॅटींग कोच आहेत. तेच कायम रहातील. तर फिल्डींग कोच असलेल्या आर. श्रीधरण यांना बदलायचं की नाही किंवा त्यांच्या रिप्लेसमेंटबद्दल अजून कुठला अंतीम निर्णय झालेला नाही.
द्रविडची 10 कोटीची डील
मुख्य कोच म्हणून राहुल द्रविडला किती पैसा मिळणार? साहजिकच हा प्रश्न मनात आला असणार. तर त्याचं उत्तर आहे 10 कोटी रुपये. दोन वर्षाच्या करारासाठी 10 कोटी रुपये राहुल द्रविडला मिळतील. द्रविडचा करार हा 2023 च्या वर्ल्ड कपपर्यंत असेल. राहुल द्रविडला NCA चं हेड बनवलेलं होतं. तिथली जबाबदारी त्यानं चोख पार पाडलीय. त्याच्याच तालमीत तयार झालेले अनेक यंग खेळाडू सध्या टीम इंडिया आणि आयपीएलचं मैदान गाजवतायत. त्याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाला पुढं घेऊन जाणारा कोच बीसीसीआयला हवा होता. आणि गांगुली आणि शाहला राहुल द्रविडशिवाय तसा मजबूत पर्याय सापडणं शक्यच नव्हतं. त्यामुळेच टीम इंडियाची कमान एका लिजेंडरी खेळाडूच्या हाती गेलीय म्हणायला हरकत नाही.
(Rahul Dravid Appointed head Coach Mhambrey Bowling Coach till 2023)
हे ही वाचा :
IPL 2021 Final: चेन्नई फॅन्सचा आनंद गगनात मावेना, केकेआरला मात देत चौथ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव
IPL 2021 Final मध्ये चेन्नईच्या त्रिकुटाने रचला इतिहास, शतक, द्विशतकासह त्रिशतकही नोंदवलं
IPL Final चा सामना संपण्याआधीच ऑरेंज कॅपचा मानकरी समोर, अवघ्या दोन धावांनी हुकली फाफची संधी