Rahul Dravid यांनी चिडून फेकली कॅप, नंतर झाला पश्चाताप, VIDEO
Rahul Dravid: शांत आणि संयमी स्वभाग ही Rahul Dravid यांची ओळख आहे. पण काहीवेळा या दिग्गजाचा स्वत:वरील ताबा सुटला. त्यावेळी त्याने असं काही केलं की, ज्याची कोणाला अपेक्षा नव्हती.
नवी दिल्ली: Rahul Dravid टीम इंडियाचे विद्यमान कोच आहेत. शांत आणि संयमी स्वभाव ही त्यांची ओळख आहे. राहुल द्रविड जेव्हा टीम इंडियाकडून क्रिकेट खेळायचे, त्यावेळी फार कमीवेळा त्यांच्या चेहऱ्यावर राग, आक्रमकता दिसली आहे. कोच झाल्यानंतर राहुल द्रविड एकदा प्रचंड रागावले होते. त्यांच हे रुप पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. ज्यांनी कोणी राहुल यांच हे रुप पाहिलं, त्यांच्या मनात एकच प्रश्न आला, राहुल द्रविड तर असे नव्हते. राहुल द्रविड यांनी आपल्या कोचिंग करिअरची सुरुवात इंडियन प्रीमियर लीगची टीम राजस्थान रॉयल्सपासून केली होती. ते टीमचे कॅप्टन आणि कोच होते.
आयपीएलच्या एका सामन्या दरम्यान राहुल द्रविड प्रचंड रागावले होते. डगआऊटमध्ये बसलेले असताना त्यांच्या एका कृतीमुळे सर्वच हैराण झाले होते. या मॅचमध्ये त्यांची टीम राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला होता.
मुंबई इंडियन्सला रोखायचं होतं
आयपीएल 2014 चा हा विषय आहे. राहुल त्यावेळी राजस्थान रॉयल्सचे मेंटॉर होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना सुरु होता. राजस्थानचा हा लीगमधला शेवटचा सामना होता. राजस्थानला क्वालिफाय करण्यासाठी दोन गुण आणि विजय हवा होता. मुंबईला पुढच्या फेरीत जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना 14.3 ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठण्यापासून रोखायचं होतं.
Team being coached by Rahul Dravid losing it’s collective calm.
Only thing left now is for Dravid to throw his cap. pic.twitter.com/55XN8XPC7b
— Gurkirat Singh Gill (@gurkiratsgill) January 13, 2022
तो सिक्स आणि द्रविड खवळले
15 व्या ओव्हरचा तिसरा चेंडू टाकल्यानंतर मुंबईची धावसंख्या 189 झाली. स्कोर बरोबर झाला. राजस्थानच्या टीमने पुढच्या राऊंडमध्ये प्रवेश केलाय, असं राजस्थानचे फॅन्स आणि टीम मॅनेजमेंटला वाटलं. पण त्यावेळी एक अपडेट आली. मुंबईने पुढच्या चेंडूवर सिक्स मारल्यास त्यांच्या 195 धावा होतील. असा स्थितीत ते राजस्थानच्या नेट रनरेट पुढे जाऊ शकतात. जेम्स फॉल्करने टाकलेल्या चेंडूवर आदित्य तरेने सिक्स मारला. त्यावेळी राहुल द्रविड प्रचंड चिडले होते. डगआऊटमध्ये बसलेल्या द्रविड यांनी रागाच्या भरात आपल्या जागेवरुन उठले व कॅप फेकली होती. नंतर द्रविड यांना झाला पश्चाताप
राहुल द्रविड यांना नंतर आपल्या वर्तनाचा पश्चातापही झाला होता. गौरव कपूर यांच्या ‘ब्रेकफास्ट विद चॅम्पियन्स’ शो मध्ये ते या घटनेबद्दल व्यक्त झाले होते. “मी कॅप फेकली, त्याबद्दल मला वाईट वाटत. जेम्स फॉल्कनर मला कधी ही गोष्ट विसरु देत नाही. कोच म्हणून मी मुलांना सांगतो की, तुम्ही तुमच्या भावना प्रदर्शित करु नका. मैदानात चूका होतात. मी माझ्यातील फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं” असं द्रविड त्या कार्यक्रमात म्हणाले.