Rahul Dravid : मोठ्या मनाचे राहुल द्रविड, याच कारणासाठी BCCI कडून मिळणारा इतक्या कोटीचा बोनस नाकारला

Rahul Dravid : राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून आदर्श उदहारण घालून दिलय. समानतेला त्यांच्या लेखी किती महत्त्व आहे, ते सिद्ध केलय. व्यक्तीगत हितापेक्षा समानतेला प्राधान्य देण्याची राहुल द्रविड यांची ही पहिली वेळ नाहीय. 2018 साली अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कोच म्हणून काम करताना त्यांनी असच उदहारण घालून दिलं होतं.

Rahul Dravid : मोठ्या मनाचे राहुल द्रविड, याच कारणासाठी BCCI कडून मिळणारा इतक्या कोटीचा बोनस नाकारला
Rahul dravid
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 8:59 AM

टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड खेळाडू म्हणून महान होतेच. पण एक व्यक्ती म्हणून देखील तितकेच श्रेष्ठ आहेत. एका कृतीमधून राहुल द्रविड यांनी त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांच्यासाठी समानता किती महत्त्वाची आहे, ते सिद्ध केलय. नुकतच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात करुन दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप उंचावला. तब्बल 11 वर्षांनी पुन्हा टीम इंडियाने ICC ट्रॉफी जिंकली. या वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी बीसीसीआयने 125 कोटी रुपये इनामाची घोषणा केली. टीमचे 15 खेळाडू, राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ अशा तिघांमध्ये ही रक्कम वाटली जाणार आहे.

BCCI कडून बक्षीसाच्या रक्कमेच वाटप करताना खेळाडूंना जास्त आणि सपोर्ट स्टाफला निम्मी रक्कम असं सूत्र ठरवण्यात आलं आहे. पण सपोर्ट स्टाफमधील राहुल द्रविड यांच्याबाबतीत बीसीसीआयने अपवाद केला. वर्ल्ड कप विजेत्या टीममधील खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी मिळणार आहेत. तितकीच रक्कम राहुल द्रविड यांना देऊ केली. पण सपोर्ट स्टाफमधील बॉलिंग कोच पारस म्हांब्रे, फिल्डिंग कोच टी. दिलीप आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड यांना 2.5 कोटी रुपये मिळणार आहेत. राहुल द्रविड सुद्धा सपोर्ट स्टाफचा भाग आहेत. त्यांनी सपोर्ट स्टाफला जितकी रक्कम मिळणार, तितकीच स्वीकारण्याचा निर्णय घेतला. बोनस म्हणून मिळणारे अतिरिक्त 2.50 कोटी रुपये नाकारले.

व्यक्तीगत हितापेक्षा समानतेला प्राधान्य

“सपोर्ट स्टाफला बोनसमध्ये जितके पैसे मिळणार, तितकेच पैसे राहुल द्रविड यांना हवे आहेत. आम्ही त्यांच्या भावनेचा आदर करतो” असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय. व्यक्तीगत हितापेक्षा समानतेला प्राधान्य देण्याची राहुल द्रविड यांची ही पहिली वेळ नाहीय. 2018 साली अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कोच म्हणून काम करताना त्यांनी असच उदहारण घालून दिलं होतं. त्यावेळी सुद्धा राहुल द्रविड यांनी अतिरिक्त बोनस नाकारुन कोचिंग स्टाफला एकसमान वाटपाचा मुद्दा मांडला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.