IND vs SA: Rahul Dravid यांनी शिखर धवनला फोन करुन सांगितला कटू निर्णय, ‘म्हणाले, आता….’
केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन बनवण्यात आलं आहे. या मालिकेत काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात IPL मध्ये चमक दाखवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा सीजन संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) मालिका खेळणार आहे. 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन बनवण्यात आलं आहे. या मालिकेत काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात IPL मध्ये चमक दाखवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. BCCI च्या निवड समितीने केलेल्या संघ निवडीवर आता काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करुनही काही सिनियर खेळाडूंना संधी मिळालेली नाही. यापैकी एक नाव म्हणजे शिखर धवन. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी धवनची संघात निवड झालेली नाही. याचं अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
राहुल द्रविड जबाबदार
शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. याला काही प्रमाणात राहुल द्रविड जबाबदार आहेत. संघनिवडीआधी राहुल द्रविड यांना अनेकांना न पटणारा एक कठोर निर्णय घ्यावा लागला. इनसाइडस्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
बीसीसीआयच्या निवड समितीची रविवारी बैठक होती. राहुल द्रविड, निवडकर्ते आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी संभाव्य खेळाडूंबद्दल चर्चा केली. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या उपस्थितीत राहुल द्रविड यांनी सिलेक्टर्सना सांगितलं की, “T 20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन आपण युवा खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे”
राहुल द्रविड शिखरला काय म्हणाले?
.राहुल द्रविड यांनी स्वत: शिखर धवनला फोन केला. टी 20 क्रिकेटमध्ये टीम युवा खेळाडूंचा प्राधान्य देण्याचा विचार करत असल्याचं त्याला सांगितलं. “दशकभरापासून शिखर धवनने भारतीय संघासाठी उत्तम योगदान दिलं आहे. पण टी 20 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे. राहुल द्रविड यांनी हा अवघड निर्णय घेतला. आमची सर्वांची त्याला सहमती होती. रविवारी संघ जाहीर होण्याआधी राहुल द्रविड यांनी स्वत: शिखर धवनला फोन करुन या निर्णयाची माहिती दिली” असं वरिष्ठ BCCI अधिकाऱ्याने सांगितलं.
कुठला फॅक्टर शिखरच्या बाजूने नव्हता
वय हा फॅक्टर शिखर धवनच्या बाजूने नव्हता. शिखर धवनने त्याच्याबाजूने टी 20 मध्ये उत्तम योगदान दिलं आहे. आयपीएलमध्ये सलग सातव्या सीजनमध्ये 400 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. 125 चा त्याचा चांगला स्ट्राइक रेट आहे.