WI vs IND | विडिंज विरुद्ध T20 सीरीज हरल्यानंतर राहुल द्रविड जे कारण देतायत ते तुम्हाला पटतं का?
WI vs IND | राहुल द्रविड यांनी काय कारण दिलं? काय सांगितलं? निर्णायक पाचव्या टी 20 मॅचमध्ये त्यांनी आपला खेळ उंचावला. टीम इंडियाला 165 धावांवर रोखलं. नंतर फक्त 2 विकेट गमावून विजय मिळवला.
फ्लोरिडा : वेस्ट इंडिजला टेस्ट आणि वनडे सीरीजमध्ये पराभूत करणाऱ्या टीम इंडियाला T20 सीरीजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने सीरीजमधील पाचव्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने सीरीजमधील पहिले दोन सामने जिंकले, नंतर दोन सामन्यात पराभव झाला. पण निर्णायक पाचव्या टी 20 मॅचमध्ये त्यांनी आपला खेळ उंचावला. टीम इंडियाला 165 धावांवर रोखलं. नंतर फक्त 2 विकेट गमावून विजय मिळवला.
टीम इंडियाने मालिका गमावल्याने माजी क्रिकेटपटू आणि भारतीय चाहते निराश झाले आहेत. खेळात जय-पराजय होत असतो, पण पराभवानंतर टीम इंडियाच्या वर्तनाने अनेक जण हैराण झालेत. हेड कोच राहुल द्रविड यांनी पराभवानंतर जे म्हटलं, ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
टीमकडून काय चूक झाली?
टीम इंडियाच्या पराभवानंतर राहुल द्रविड यांनी मीडियाशी संवाद साधला. अखेरीस भारतीय टीमकडून काय चूक झाली? त्या बद्दल त्यांनी मीडियाला सांगितलं. टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाला काय मिळालं? या बद्दलही त्यांनी सांगितलं. आधी राहुल द्रविड पराभवाबद्दल काय बोलले, ते जाणून घ्या.
राहुल द्रविड काय म्हणाले?
“टीम इंडियाने T20 सीरीजमध्ये पहिले दोन सामने गमावल्यानंतर चांगलं पुनरागमन केलं. टीमने सलग दोन सामने जिंकले. पण शेवटचा सामना टीमला व्यवस्थित संपवता आला नाही. टीमकडून काही चूका झाल्या” असं राहुल द्रविड म्हणाले. “टीम इंडिया चांगली फलंदाजी करु शकली असती, हे राहुल द्रविड यांनी मान्य केलं. ही एक युवा टीम असून सध्या ही टीम बनण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. सीरीज हरण्याच आम्हाला दु:ख आहे” असं द्रविड म्हणाले.
ही युवा टीम कशी?
राहुल द्रविड यांचं वक्तव्य हैराण करणार आहे. राहुल द्रविड ज्या टीमला युवा बोलतायत, त्या टीममधील खेळाडू जास्त टी 20 क्रिकेट खेळतात. हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये बरेच क्रिकेट खेळलेत. .या खेळाडूंकडे सर्वोत्त कोच, सपोर्ट स्टाफ आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत. आर्थिक दृष्टया सुद्धा हे सर्व खेळाडू मजबूत आहेत. पण वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीज हरल्यानंतर या संघाला युवा टीम ठरवलं जातं.
बॉडी लँगवेज काय सांगते?
हेड कोचच नाही, कॅप्टन हार्दिक पांड्या सुद्धा असच काही म्हणाला. कधी-कधी पराभव चांगला असतो, असं हार्दिक पांड्या म्हणाला. पराभवानंतर हार्दिक पांड्या आणि राहुल द्रविड यांची ज्या प्रकारची बॉडी लँगवेज आहे, ते पाहून त्यांना सीरीज हरल्याने फार फरक पडलेला नाही, असं दिसतय.