दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?

दीपकने खेळलेली मॅचविनिंग खेळी कौतुकास्पदच नाही तर विश्वासावर 'विश्वास' ठेवायला शिकवते. कितीही वाईट परिस्थिती आली तरी संयम ठेवायला शिकवते. | Deepak Chahar india vs Sri lanka 2nd ODI

दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा 'तो' मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं...?
सामन्यादरम्यान राहुल द्रविडने दीपक चहरसाठी एक मेसेज पाठवला...
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 12:39 PM

मुंबई : भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन तंबूत परतले… 193 धावांवर सात विकेट्स… अजूनही जिंकण्यााठी 83 धावांची गरज… हातात फक्त 3 विकेट्स… मैदानावर धोनीचा आवडता खेळाडू दीपक चहर (Deepak Chahar) आणि श्रीलंकन दौऱ्यासाठी असलेला उपकर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar kumar)…. या अशा सगळ्या परिस्थितीत दीपकने खेळलेली मॅचविनिंग खेळी कौतुकास्पदच नाही तर विश्वासावर ‘विश्वास’ ठेवायला शिकवते. कितीही वाईट परिस्थिती आली तरी संयम ठेवायला शिकवते. पण त्याच वेळी आयुष्यात कुणीतरी एक व्यक्ती खंबीर पाठीशी असावा लागतो जो कठीण प्रसंगात दिशा दाखवतो… चहरने भारताच्या माथी विजयी टिळा लावला खरा पण त्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविडचा तो एक मेसेज कारणीभूत ठरल्याचं खुद्द चहलने मॅच संपल्यानंतर सांगितलं.

राहुल द्रविडचा तो मेसेज काय होता…?

श्रीलंकेने भारतीय संघाला विजयासाठी 276 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ढेपाळला. पहिल्या फळीतील आणि मधल्या फळीतील खेळाडू लवकर तंबूत परतले. अपवाद सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. पांड्याने 35 धावा केल्या. मात्र श्रीलंकन गोलंदाजांनी मॅचमध्ये पुनरागमन करत एक एक विकेट्स घेत भारताची अवस्था 193 धावांवर सात बाद, अशी केली…. अशा वेळी मैदानात चहर-भुवीची जोडी होती… या जोडीने संयम शब्दाचा खरा अर्थ काय असतो, हे दाखवून दिलं. ही जोडी विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत होती. या साऱ्यात राहुल द्रविडने नेमक्या क्षणी चहरसाठी एक मेसेज पाठवला.

“तुला शेवटपर्यंत खेळायचंय. सगळे बॉल खेळून काढ…”, असा मेसेज राहुल द्रविडने चहरसाठी पाठवला. साहजिक द्रविडचा तो मेसेज चहरने सामन्याच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवला. कोणतीही घाई गडबड न करता चहर खेळपट्टीवर शेवटपर्यंत उभा राहिला. परिणामी भारताने अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली.

विजयानंतर राहुलचा दमदार स्पीच

या धाकड विजयानंतर सर्वांनाच आनंद झाला. पण या दौऱ्यात प्रथमच भारताचा मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडला मात्र त्याच्या खेळाडूंवर खास अभिमान वाटला. सामना सुरु असतानाही सतत पॅव्हेलियनमधून राहुल इतर खेळाडूंसोबत करत असलेल्या चर्चेतून हा सामना त्याच्यासाठी किती महत्त्वाचा होता हे कळत होते. त्यामुळे विजयानंतर राहुलने खेळाडूंचे अभिनंदन करत ड्रेसिंग रुममध्ये एक दमदार स्पीच देखील दिला.

सामन्याचा लेखाजोखा

श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची आज खराब सुरुवात झाली. आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ (12) तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ इशान किशन (1), शिखर धवन (29), मनिष पांडे (37) हार्दिक पंड्या (0) एका मागोमाग एक ठराविक अंतराने बाद होत गेले. परंतु सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली होती. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने 35 धावांचं योगदान दिलं. कृणाल बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र दीपक चाहरने हाती घेतली.

सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली.

(Rahul Dravid Secret Message To Deepak Chahar india Win The match india vs Sri lanka 2nd ODI)

हे ही वाचा :

दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.