IND vs ENG: उमरान मलिकला आयर्लंडमध्येच थांबण्याची सूचना, इंग्लंड विरुद्ध सीरीजसाठी निवड? ‘हे’ खेळाडू परतणार मायेदशी

IND vs ENG: भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) मध्ये काल झालेला दुसरा टी 20 सामना खूपच रोमांचक ठरला. भारताने आयर्लंड सारख्या कमकुवत संघाविरुद्ध अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला.

IND vs ENG: उमरान मलिकला आयर्लंडमध्येच थांबण्याची सूचना, इंग्लंड विरुद्ध सीरीजसाठी निवड? 'हे' खेळाडू परतणार मायेदशी
umran malikImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 10:32 AM

मुंबई: भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) मध्ये काल झालेला दुसरा टी 20 सामना खूपच रोमांचक ठरला. भारताने आयर्लंड सारख्या कमकुवत संघाविरुद्ध अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. खरंतर काल आयर्लंडने थोडा अजून चांगला खेळ दाखवला असता, तर निकालाचं चित्र वेगळ दिसलं असतं. भारताने आयर्लंड विरुद्धची ही दोन टी 20 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेच नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) दिलं होतं. भारताने आयर्लंड दौऱ्यासाठी तुलनेने दुय्यम संघ निवडला होता. कारण आयर्लंड मध्ये मालिका सुरु असताना, दुसरा संघ इंग्लंडमध्ये सराव (India England Tour) करतोय. इंग्लंड विरुद्ध येत्या 1 जुलैपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. सगळे सीनियर खेळाडू या टीम मध्ये आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे संघ निवडले होते. आयर्लंड दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. यात उमरान मलिक, अर्शदीप सिंह, दीपक हुड्डा, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.

आयर्लंड दौऱ्यातील खेळाडूंना इंग्लंड विरुद्ध संधी

भारत इंग्लंडमध्ये कसोटी सामना झाल्यानंतर तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मागच्यावर्षी कोविडमुळे एक कसोटी सामना रद्द झाला होता. तो हा कसोटी सामना आहे. कसोटी सामन्यासाठी संघ आधीच निवडण्यात आला आहे. पण इंग्लंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी संघ निवड अजून झालेली नाही. आयर्लंड दौऱ्यावरील काही खेळाडूंचा वनडे आणि टी 20 संघात समावेश होऊ शकतो.

आयर्लंड सीरीजनंतर मायदेशी कोण परतणार?

आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या हार्दिक पंड्याससह काही खेळाडूंना आयर्लंड मध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे. बाकीचे खेळाडू मायदेशी परततील. वेंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, राहुल त्रिपाठी आणि रवी बिश्नोई हे खेळाडू मायदेशी परतणार आहेत. अन्य खेळाडूंना तिथेच थांबण्यास सांगण्यात आले आहे. स्पोर्ट्स टायगरने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

उमरान मलिक हिरो

आयर्लंडमधील टी 20 सीरीजसाठी जे नवीन खेळाडू निवडण्यात आले होते. त्यात फक्त उमरान मलिकला थांबण्यास सांगितलं आहे. याचाच अर्थ बीसीसीआयची निवड समिती उमरान मलिकचा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्याचा विचार करत आहे. आयर्लंडच्या विरुद्धच्या विजयात काल उमरान मलिक हिरो ठरला. त्याने चार षटकात 42 धावा दिल्या. पण शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा करु दिल्या नाहीत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.